रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा ! – पोलीस निरीक्षकांना निवेदन

 पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर (डावीकडे) यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी

बत्तीस शिराळा (जिल्हा सांगली), १ एप्रिल (वार्ता.) – रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी श्री. अशोक म्हस्कर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. राजेंद्र खुर्द आणि श्री. राजवर्धन देशमुख उपस्थित होते.