हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने ‘संत संपर्क’ अभियान

हरिद्वार, २९ मार्च (वार्ता) – येथील कुंभमेळ्यामध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी जनजागृती व्हावी, या हेतूने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने ‘संत संपर्क’ या अभियान राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत धर्मजागृतीसाठी प्रयत्नरत असलेले भाग्यनगर (तेलंगाणा) येथील ‘श्री निखिल चेतना केंद्रा’चे मार्गदर्शक पू. अनिलकुमार जोशीमहाराज यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी भेट घेतली. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस हेही उपस्थित होते. या प्रसंगी महाराजांनी त्यांच्या आश्रमामध्ये समितीच्या धर्मसेवकांना आमंत्रित केले.
पू. अनिलकुमार जोशीमहाराज हे तेलंगाणामध्ये धर्मांतर रोखणे, धर्मजागृतीच्या विषयी उपक्रम राबवणे आदी कार्य करत आहेत. या प्रसंगी श्री. चेतन राजहंस यांनी पू. जोशीमहाराज यांना सनातन संस्थेच्या गोवा येथील आश्रमामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. या वेळी महाराजांनी कुंभमेळ्यामध्ये सेवेसाठी आलेल्या सर्व साधकांची २ दिवसांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली. विशेष म्हणजे पू. जोशीमहाराज यांचे बंधू श्री. उदय जोशी यांनी महाप्रसादाच्या वेळी स्वत: उपस्थित राहून साधकांची आपुलकीने चौकशी केली.
थोडक्यात महत्त्वाचे : १०.०६.२०२६
साधकांची प्रेमाने काळजी घेऊन त्यांना घडवणार्या सनातनच्या ६० व्या (समष्टी) संत पू. रेखा काणकोणकर !
तरुण पिढी उद्ध्वस्त करणार्या ‘रेव्ह’ मेजवान्यांचे आयोजन करणार्यांवर थेट ‘मकोका’ लावा ! – संजय शिरसाट, पालकमंत्री
नोंदणीकृत औषधविक्रेता नसलेली औषधालये बंद होणार !
‘म्हजे घर’च्या सर्व अर्जदारांना ६ महिन्यांत सनद मिळणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
खराडी (पुणे) येथे दिवाळखोर माहिती तंत्रज्ञान आस्थापनात नोकरी देऊन अनेकांची फसवणूक !