ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत, तसेच प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदने

होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीची मोहीम

ठाणे, २७ मार्च (वार्ता.) – होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे गैरप्रकार रोखून या सणाचे पावित्र्य राखले जावे, तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी सहकार्य व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठाणे पोलीस आयुक्तालय भागातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये निवेदने देण्यात आली, तसेच याच आशयाचे निवेदन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथेही देण्यात आले. ही सर्व निवेदने देतांना विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

अंबरनाथ येथील पोलीस निरीक्षकांना निवेदन देताना हिंदुत्वनिष्ठ
अंबरनाथ येथील पोलीस निरीक्षकांना निवेदन देताना हिंदुत्वनिष्ठ

१. डोंबिवली (पूर्व) येथील रामनगर आणि पश्‍चिम येथील विष्णुनगर पोलीस ठाणे येथे, तर अंबरनाथ (पूर्व) पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोंगे यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी श्री आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री. प्रदीप नवार, सनातन संस्थेचे श्री. सौरभ मांडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विरेश अहिर आणि श्री. उल्हास चौधरी उपस्थित होते.

बदलापूर येथील पोलीस निरीक्षकांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ
बदलापूर येथील पोलीस निरीक्षकांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

२. बदलापूर (पूर्व) येथील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक देशमुख यांना निवेदन देतांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे श्री. विनीत मोरे उपस्थित होते. पोलिसांना दैनिक सनातन प्रभातचा ‘आपत्काळ विशेषांक’ भेट देण्यात आला.

३. ठाणे येथील राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनाही निवेदन देण्यात आले.