उत्तरप्रदेशातील कहिजरी पोलीस ठाण्यातील पोलीस हुंड्याच्या प्रकरणात पिता आणि पुत्र यांना पकडण्यास भीखदेव गावात गेल्यावर त्यांच्यावर धर्मांधांकडून दगड आणि विटा यांद्वारे आक्रमण करण्यात आले. यात काही पोलीस घायाळ झाले. धर्मांधबहुल असणार्या परिसरात जाऊन तेथे लपलेल्या गुन्हेगारांना पकडणे, ही पोलिसांसाठी सोपी गोष्ट राहिलेली नाही. या आधीही गोहत्या करणार्या, दंगली घडवणार्या धर्मांधांना पोलीस पकडायला गेल्यावर त्यांच्या धर्मबांधवांकडून अशाच प्रकारे पोलिसांवर आक्रमण केल्याचे चित्र अनेक वेळा पहायला मिळते. या वेळी पोलिसांवर आक्रमण करण्यात धर्मांध महिलांनीही पुढाकार घेतला होता. या पंथाच्या महिलांची ‘बुरख्यामध्ये रहाणारी पीडित अबला’ असे चित्र आपल्याकडे रंगवले जाते; मात्र या बुरखाधारी महिलांच्या गुन्हेगारी वृत्तीकडे डोळेझाक करून चालणार नाही. पोलिसांवर आक्रमण करण्याचे धारिष्ट्य या धर्मांधांना कुठून येते ? उत्तरप्रदेशमध्ये हिंदुत्वनिष्ठ योगी आदित्यनाथ यांचे सरकार आहे. मुख्यमंत्रीपदी आरूढ झाल्यानंतर त्यांनी अनेक समाजहितकारी निर्णय घेऊन जनतेला आणि त्याहून अधिक हिंदूंना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. अनेक दंगलखोर धर्मांधांच्या विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावण्यात आला आणि त्यांना गजाआड करण्यात आले. असे असूनही उत्तरप्रदेशात धर्मांधांचा उद्दामपणा दिवसेंदिवस वाढत आहे. लव्ह जिहाद किंवा हिंदूंवर आक्रमण करणे यांसारखे प्रकार अल्प झालेले नाहीत. यावरून सद्यःस्थितीत त्यांच्यावर केलेल्या कारवाया पुरेशा नाहीत, असेच म्हणावे लागेल. ‘सत्तेवर कुणीही आले, तरी आमचे कुणीही काहीही बिघडवू शकणार नाही’, असा समज धर्मांधांमध्ये निर्माण झाला आहे. त्यांच्यावर वचक निर्माण करायचा असेल, तर त्यांच्या विरोधात अधिक कठोर व्हावे लागेल. हिंदूंचे घर पेटवणार्या किंवा हिंदु मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्या धर्मांधांच्या विरोधात कायदेशीर कारवाई होते; मात्र ते कायदे आणि त्याद्वारे होणार्या शिक्षा पुरेशा नाहीत, असेच म्हणावे लागेल. असे कायदे होतील तेव्हा होतील; मात्र धर्मांधांवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही, ही चिंतेची गोष्ट आहे. बर्याचदा धर्मांधांनी समाजविघातक कृत्य केले, तर पोलीस प्रथम त्याकडे डोळेझाक करण्याचा प्रयत्न करतात; कारण धर्मांध हे उपद्रवी असतात आणि त्यांच्याशी दोन हात करणे पोलिसांना परवडणारे नसते. पोलिसांच्या अशा गप्प बसण्यामुळे धर्मांधांचे फावले असून ‘पोलीस आमचे काहीच वाकडे करू शकणार नाहीत’, अशी उद्दाम वृत्ती त्यांच्यात निर्माण झाली आहे. त्यामुळेच धर्मांध आणि आता त्यांच्या महिला पोलिसांवर आक्रमण करत आहेत. पोलिसांनी त्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा न घेतल्यास उद्या धर्मांधांची मुलेही पोलिसांवर दगड उगारतील. ही नामुष्की ओढवू नये, यासाठी पोलीस काय कृती करणार ? हिंदूंवर हात उगारणे, त्यांना मारहाण करणे हे सोपे असते; कारण हिंदु हे सहिष्णु आणि निरुपद्रवी असल्याने ते नेहमीच ‘सॉफ्ट टार्गेट’ ठरतात. पोलिसांमध्ये जर खरोखरच धमक असेल, तर त्यांनी धर्मांधांच्या वस्तीत घुसून समाजविघातक कारवाया करणार्यांना अटक करून दाखवावी. अशी निर्भयता आणि धडाडी पोलिसांनी दाखवली, तरच धर्मांध ताळ्यावर येतील आणि समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल.