यवतमाळ येथे केंद्रीय कोरोना नियंत्रण पथकाची भेट !

केंद्रीय पथकाची यवतमाळातील प्रतिबंधित क्षेत्राला भेट

यवतमाळ, २ मार्च (वार्ता.) – जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत प्रतिदिन वाढ होत आहे. त्याची कारणे जाणून घेऊन त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यासाठी केंद्रीय कोरोना पथकाचे डॉ. आशिष रंजन यांनी १ मार्च या दिवशी शहराला भेट दिली. या वेळी त्यांनी जिल्हा प्रशासनासमवेत बैठक घेऊन कोरोनाच्या रुग्णांसाठी असलेल्या सोयीसुविधांची पहाणी केली. त्यानंतर शहरातील ‘विदर्भ हाऊसिंग सोसायटी’ आणि ‘शिरे ले-आऊट’ या प्रतिबंधित क्षेत्राला भेट देऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. रुग्णांची संख्या वाढत असली, तरी मृत्यूदर (२.७ टक्के) न्यून असल्याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले.