श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानच्या अध्यक्षपदी मेघशाम नारायणपुजारी यांची निवड

१. मेघशाम नारायणपुजारी यांचा सत्कार करतांना अन्य मान्यवर

नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) – येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानच्या विश्‍वस्तांची बैठक येथील दत्त देव संस्थानच्या सभागृहात झाली. या बैठकीत अध्यक्ष म्हणून मेघशाम नारायणपुजारी आणि सचिव म्हणून महादेव वसंत पुजारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष अशोक जनार्दन पुजारी हे होते.

मावळते अध्यक्ष अशोक पुजारी, सचिव गोपाळ अवधूत पुजारी आणि विश्‍वस्त यांनी नूतन अध्यक्ष अन् सचिव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. ‘दत्त देव संस्थानच्या माध्यमातून यात्रेकरू, तसेच भाविकांना विविध आणि आधुनिक सेवा-सुविधा पुरवून विकासासाठी प्रयत्नशील राहू’, असे नूतन अध्यक्ष अन् सचिव यांनी सांगितले. या वेळी विश्‍वस्त प्रा. गुंडो श्रीपाद पुजारी, अशोक जनार्दन पुजारी, विकास दिगंबर पुजारी, रामकृष्ण विष्णु पुजारी, गोपाळ अवधूत पुजारी, अमोल अवधूत विभूते उपस्थित होते.