‘आधार’च्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

नवी देहली – ‘आधार’ योजना वैध ठरवण्याच्या विरोधात वर्ष २०१८ मध्ये प्रविष्ट केलेल्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. न्यायालयाने २६ सप्टेंबर २०१८ या दिवशी दिलेल्या निकालावर आधार योजना वैध ठरवतांना काही तरतुदी रहित केल्या होत्या. त्यात आधार क्रमांक, बँक खाते आणि भ्रमणभाष क्रमांक आणि शाळा प्रवेशाशी जोडण्याच्या कलमांचा समावेश होता. आता ५ न्यायाधिशांच्या खंडपिठाने ४-१ अशा बहुमताने दिलेल्या निकालात फेरविचार करणार्‍या याचिका फेटाळल्या आहेत.

न्यायालयाने म्हटले की, ज्या फेरविचार याचिका प्रविष्ट करण्यात आल्या होत्या, त्या पुराव्यांअभावी फेटाळण्यात येत असून या निकालाचा फेरविचार करण्याची आवश्यकता नाही. मोठ्या न्यायपिठापुढे हे प्रकरण असल्याकारणाने त्यावर फेरविचार करता येणार नाही.