नम्र आणि साधकांशी जवळीक साधणार्‍या कु. अनुराधा जाधव !

गोवा येथील साधिका कु. अनुराधा जाधव यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. अनुराधा जाधव

१. सौ. शुभा सावंत, म्हापसा

अ. ताई आमचा व्यष्टी साधनेचा आढावा घेते. तिला मनाची विचारप्रक्रिया सांगितल्यावर तिने सांगितलेली सूत्रे ऐकून आमची अंतर्मुखता वाढते आणि तिने सूत्रे सांगितल्यावर ती पूर्ण करण्यासाठी आमच्या मनाचा उत्साह वाढतो.

आ. ताई ‘साधकांना ताण येणार नाही’, अशा प्रकारे सेवांचे नियोजन करते. ताई साधकांच्या स्थितीचा अभ्यास करून त्याप्रमाणे नियोजन करते.

२. सौ. नंदा नागवेकर, मडगाव

अ. ताई प्रत्येक कृती तळमळीने करते.

आ. ताई माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, तरी मला तिच्याशी मनमोकळेपणाने बोलता येते. आपण आईला जशा आपल्या अडचणी सांगतो, तशा मला ताईला अडचणी सांगता येतात.

इ. ताईमध्ये अहं अल्प आहे. ती स्वतःकडून झालेल्या चुका लगेच सत्संगात सांगते. ‘तिचे बोलणे ऐकत रहावे’, असे मला वाटते.

३. सौ. शैला श्रीकांत देसाई आणि सौ. मेघना गावकर, काणकोण, गोवा.

३ अ. प्रेमभाव

१. स्वतःच्या मार्गदर्शनातून ‘एखाद्या साधकाचे शंकानिरसन झाले नाही’, हे लक्षात आल्यास ताई स्वतः त्या साधकाकडे जाऊन बोलतात, सर्व समजून घेतात आणि त्या साधकांचे शंकानिरसन करतात.

२. ताई सर्व साधकांच्या अडचणी प्रेमाने समजून घेतात आणि ‘साधकांची व्यष्टी अन् समष्टी साधना चांगली व्हावी’, यासाठी प्रयत्न करतात.

४. सौ. वैशाली राजहंस, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

४ अ. ‘अनुराधा जाधव’ यांच्या नावाच्या आद्यक्षरावरून सुचलेले काव्य

अ – अगाध कृपा तुझ्यावरी गुरूंची असे ।
नु – नुरली (नसे) चिंता तुला प्रगतीची, श्रद्धा तुझी गुरुवरी असे ।
रा – राहील अशीच कृपादृष्टी तुझ्यावरी गुरूंची सखे ।
धा – धारा वहात येते सद्गुरूंच्या वाणीची तुझ्याकडे ।

जा – जाणार यातूनच तू गुरुचरणांकडे ।
ध – धरला हात तुझा, मोक्षापर्यंत नेणार असे ।
व – वळून बघ माघारी, पदोपदी गुरुकृपाच दिसे ।

४ आ. गुणवैशिष्ट्ये

१. अनुराधा प्रत्येक निर्णय शांत आणि स्थिर राहून विचारपूर्वक घेते.

२. तिच्या बोलण्यात नम्रता आणि स्थिरता आहे. ती प्रत्येक सत्संगात एका लयीत आणि नम्रतेने बोलते.

३. तिची प्रत्येक साधकाशी जवळीक आहे. साधकांना तिचा आधार वाटतो.