‘वर्ष २०१३ मध्ये समवेत काम करणार्या तरुणीवर बलात्कार करून हत्या करण्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तौदम जिबल सिंह या तरुणाची ८ वर्षांनंतर निर्दाेष सुटका करण्यात आली. स्थानिक न्यायालयामध्ये न्याय मिळण्यास विलंब झाल्याने या तरुणाला केवळ आरोपांमुळे ८ वर्षे कारागृहात काढावी लागली. यामुळे आता मणिपूरचे मुख्यमंत्री एन्. बिरेन सिंह यांनी या तरुणाला सरकारी नोकरी आणि घर देण्याची घोषणा केली आहे.’