परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले

वर्ष २०२० मध्ये झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या वेळी ऑनलाईन पद्धतीने दाखवलेल्या ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेसंबंधी केलेले अमूल्य मार्गदर्शन’ या विषयावर परात्पर गुरु डॉक्टरांशी साधकांच्या झालेल्या भेटींच्या वेळच्या चित्रफितींमधील संवाद येथे देत आहोत.

१. साधना करून ६० टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त करण्याचे महत्त्व

१. ६० टक्के आध्यात्मिक पातळीपर्यंत मन कार्यरत असल्यामुळे मनोलय होण्यास वेळ लागतो !

साधिका : कधी कधी मनात सेवेविषयी नकारात्मक विचार येतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले : ‘तसे होऊ नये’, यासाठी संत व्हायचे असते. ७० टक्के आध्यात्मिक पातळीपर्यंत जायचे आहे. तेव्हा मनच नष्ट होते. मग मनात नकारात्मक विचार कसे येणार ? मनात जे नकारात्मक विचार येतात, ते सारणीमध्ये लिहून त्यावर स्वयंसूचना देता कि नाही ?

साधिका : हो. मी देते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : आणखी काही कठीण प्रसंग असतील, तर संतांनासुद्धा विचारा. ६० टक्के आध्यात्मिक पातळीपर्यंत मन पुष्कळ बलवान आणि कार्यरत रहाते. त्यामुळे मनोलय होण्यास पुष्कळ वेळ लागतो, तरी चिंता करू नका. साधना केल्यावर पुढे जाल.

२. याच जन्मात साधना करून ६० टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त करा !

साधक : आम्ही आता पुढचा जन्म घेणार कि नाही ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : पुढील जन्माची गोष्ट का करायची ? याच जन्मात ६० टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त करायची आहे; कारण पुढचा जन्म आपल्याला नको आहे. आताच कलियुगाची ही स्थिती आहे. पुढचा जन्म घेऊन काय होणार ?

साधक : ‘पुढचा जन्म नको’, असेच आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : हा, तर ठीक आहे.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक