‘औरंगाबाद’ शहराच्या नामांतराविषयी विश्व हिंदू परिषदेची भूमिका

नगर – औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे, यासाठी आमचा पाठिंबा असेलच; कारण स्वतंत्र भारतात परकियांची नावे पुसली पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. तसेच ‘अहमदनगर’ शहराचे नावही ‘नगर’ असावे, असे आमचे मत आहे, असे मत विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय संयुक्त मंत्री दादाजी वेदक यांनी व्यक्त केले. नगरमध्ये ५ जानेवारी या दिवशी विश्व हिंदू परिषदेची पत्रकार परिषद झाली. या वेळी वेदक यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतराविषयी आपली भूमिका मांडली.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नाना जाधव, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी, ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर आदी उपस्थित होते.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)
हिंगणगाव-खामगाव टेक (पुणे) येथील २४ कोटी रुपयांचा पूल पहिल्याच पावसात कोसळला !
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस !