मोगलांच्या काळात थेट हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर आक्रमण करून त्याचे रूपांतर इस्लामी स्थळामध्ये करण्यात येत होते. आताच्या काळात अशा प्रकारे लपूनछपून ती कह्यात घेण्याचे काम केले जात आहे, याविरोधात सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !

उज्जैन (मध्यप्रदेश) – येथील भर्तृहरि गुफेजवळ असणार्या नाथ संप्रदायाच्या खासगी भूमीवर असणार्या पंच पीरच्या समाधीवर धर्मांधांकडून हिरवा रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत असतांना भर्तृहरि गुफेचे महंत पीर योगी श्री रामनाथ महाराज यांनी साधू-संतांच्या माध्यमांतून त्यांना विरोध करत हाकलून लावले. हे स्थान पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येते. येथे रंगकाम करण्यास बंदी आहे.
पीर योगी श्री रामनाथ महाराज यांनी सांगितले की, प्राचीन काळापासून येथे पंच पीर यांची समाधी आहे. या भूमीवर नाथ संप्रदायाचा मालकी अधिकार आहे. काही धर्मांध येथे येऊन त्याला हिरवा रंग देत असल्याची तक्रार पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. एक-दोन वर्षांपूर्वीही असा प्रयत्न करण्यात आला होता. त्या वेळही तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांवर कारवाईही केली होती. जेथे समाधी आहे त्याच्या शेजारील शेतभूमी नाथ संप्रदायाची आहे. याचे सरकारी कागदपत्रेही उपलब्ध आहेत.
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी