हिंजवडी येथील आयटी पार्कमध्ये सेक्स रॅकेट चालवणारे हॉटेल ग्रॅन्ड मन्नत ६ मासांसाठी सील

पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात घडणारे हे प्रकार लाजिरवाणेच !

हिंजवडी येथील हॉटेलमध्ये पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला

पिंपरी-चिंचवड – येथील आयटी पार्कमध्ये सेक्स रॅकेट चालणारे ग्रॅन्ड मन्नत हे हॉटेल पोलिसांनी ६ मासांसाठी सील केले आहे. पोलिसांनी तेथील ६ महिलांची सुटका केली आहे. याआधी सप्टेंबर २०२० मध्ये हिंजवडी येथील एका हॉटेलमध्ये चालू असलेेले सेक्स रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले होते. ग्रॅन्ड मन्नत या हॉटेलचा व्यवस्थापक आरोपी गणेश पवार आणि त्याचे अन्य साथीदार हे पीडित तरुणींकडून स्वतःच्या आर्थिक लाभासाठी देहविक्रीचा व्यवसाय करून घेत असल्याचे अन्वेषणात निष्पन्न झाले होते. हे सेक्स रॅकेट ‘ऑनलाईन’ माध्यमातून चालू होते. या प्रकरणी गणेश कैलास पवार, समीर उपाख्य तय्यब सय्यद, युसुफ सरदार शेख, हिरा यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.