धर्मादाय रुग्णालयांमध्ये नियमाप्रमाणे १० टक्के गरीब रुग्णांना उपचार द्यावेत ! – ग्रामविकासमंत्री

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

मुंबई – शहर आणि राज्य यांतील धर्मादाय रुग्णालयांमध्ये १० टक्के गरीब रुग्णांना विनामूल्य उपचारावरील नियमांचे पालन करून उपचार द्यावेत, असे निर्देश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. (असे निर्देश का द्यावे लागतात ? – संपादक) कोरोना महामारीच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील रुग्ण शहरात उपचारासाठी आले नाहीत; मात्र आता रुग्ण उपचारासाठी येण्याचा ओघ वाढू शकतो, यासाठी धर्मादाय रुग्णालयांनी सहकार्य करून, गरीब रुग्णांची सेवा करावी, अशा सूचना विधी आणि न्याय विभाग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या. या संदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या.

या वेळी तटकरे म्हणाल्या की, रुग्णालयात उपलब्ध जागा आणि उपचारपद्धती यांची माहिती प्रथम दर्शनी रुग्णांना मिळणे आवश्यक आहे. रुग्णांना उपचारासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती आणि पूर्तता करण्यासाठी यंत्रणाही असणे आवश्यक आहे. या वेळी विविध धर्मादाय रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.