दुःखद निधन

मुंबई – येथील आणि गेली काही वर्षे वाई येथे वास्तव्यास असणार्‍या सनातनच्या साधिका सौ. सुमन वसंत भिसे (वय ७२ वर्षे) यांचे २० नोव्हेंबरच्या रात्री २ वाजता अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले. त्यांचे पुत्र श्री. नित्यानंद भिसे आणि सून सौ. भक्ती भिसे सनातन प्रभातमध्ये कार्यरत होते. त्यांच्या पश्‍चात पती, २ मुले, २ सुना, ३ मुली, ३ जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार भिसे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.