हिंदु असल्याचे सांगत मुसलमान तरुणीने हिंदु तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केला विवाह !

विवाहानंतर तरुणाचे धर्मांतर आणि सुंता !

‘लव्ह जिहाद’चे आणखी एक रूप ! हिंदु तरुण आणि तरुणी यांना धर्मशिक्षण नसल्याने ते धर्मांधांच्या प्रेमाच्या जाळ्यात फसतात. त्यामुळे त्यांना धर्मशिक्षण देण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी प्रयत्न केला पाहिजे !

नवी देहली – नाजरीन अन्सारी या तरुणीने फेसबूकद्वारे तिचे नाव ‘सोनिया’ असे सांगून मोहित कुमार या हिंदु तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्याच्याशी विवाह केला; मात्र त्यापूर्वी तिच्या कुटुंबियांनी मोहित याला धर्मांतर करण्यास भाग पाडले, तसेच एका खासगी रुग्णालयात नेऊन त्याची सुंताही केली. नाजरीन उत्तरप्रदेशातील गोंडा जिल्ह्यात रहाणारी आहे, तर हा तरुण रोहिणी जिल्ह्यात रहाणारा आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.