ब्राह्मणांचा द्वेष करून राज्यघटनेचा अवमान करणारे (काँग्रेसचे) ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची हकालपट्टी करा !

‘परशुराम संस्कार सेवा संघा’चे योगेश चांदोरीकर यांची प्रशासनाकडे मागणी

ब्राह्मण समाजाचा वारंवार अवमान केला जात असूनही जात्यंधांवर कठोर कारवाई होत नाही, हे खेदजनक आहे. ब्राह्मणद्वेष पसरवून जातीजातींत फूट पाडण्याचे षड्यंत्र रोखण्यासाठी सरकार ठोस पाऊल उचलणार का ?

नितीन राऊत

लातूर, २३ जुलै (वार्ता.) – ब्राह्मणांचा द्वेष केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा परशुराम संस्कार सेवा संघाकडून जाहीर निषेध करण्यात आला आहे. याविषयी निवेदन देण्यात आले असून मंत्री राऊत यांनी राज्यघटनेची खोटी शपथ घेऊन तिचा अपमान केला असल्याचा आरोप ‘परशुराम संस्कार सेवा संघा’चे योगेश चांदोरीकर यांनी केला आहे.

जिल्हाधिकार्‍यांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यघटनेची शपथ घेऊन ‘कुणाशीही आकस बुद्धीने वागणार नाही, आकस बुद्धीने कोणतेही कृत्य करणार नाही’, असे म्हटले; मात्र अशी शपथ घेऊनही ते वारंवार ब्राह्मणांचा द्वेष करत आहेत. याविषयी राऊत यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.’

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सामाजिक माध्यमांवर एक ‘पोस्ट’ करून ब्राह्मण समाजाविषयी अवमानकारक वक्तव्य केले आहे.