
हुगळी (बंगाल) – येथे तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांना जमावाकडून अज्ञात वस्तू फेकून मारण्यात आली. यात घायाळ झाल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले. चंडीतला पोलीस ठाण्याच्या बाहेरच ही घटना घडली. खासदार कल्याण बॅनर्जी हे पोलीस ठाण्यात निवेदन देण्यासाठी जात होते. बॅनर्जी यांनी आरोप केला की, हे आक्रमण भाजपच्या लोकांनी केले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी दगड किंवा चेंडू यांसारखी वस्तू मारली आणि मला घायाळ करण्याचा प्रयत्न केला.
🔥 Stones Pelted at Trinamool Congress MP Kalyan Banerjee
Shortly after an attack on TMC leader Abhishek Banerjee, TMC MP Kalyan Banerjee has now faced the fury of an angry crowd, with stones reportedly being thrown at him.
As TMC loses its grip over Bengal, public resentment… pic.twitter.com/q82RSOskvL
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 31, 2026
बॅनर्जी घायाळ झाले नाहीत. ते केवळ नाटक करत आहेत, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर ३० मे या दिवशी जमावाकडून आक्रमण करण्यात आले. यात ते किरकोळ घायाळ झाले. या आक्रमणानंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केले गेले. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना सोडण्यात यावे, असे निवेदन देण्यासाठी कल्याण बॅनर्जी चंडीतला पोलीस ठाण्यात जात होते.
Russian Missile Attack : भारताने रशियाच्या राजदूताला बोलावून निषेध नोंदवला !
CJP Protest : ‘न्यायालयाला यात ओढू नका’, असे सांगत तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
हत्येच्या घटनेला विरोध करणार्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती !
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी