
१. साधकाला शरण जाण्यासाठी वय किंवा परिस्थिती याचे बंधन नसते.
२. ज्ञान, धर्म, कर्म किंवा साधन हे सर्व अल्प असले, तरी चालेल; पण श्रद्धा असली की, भगवंत शरणागतीचे दार उघडतो.
३. जो साधक ‘मी आणि माझे’, ही भावना त्यागतो, त्याला शरणागतीची पहिली पायरी प्राप्त होते.
४. साधक जेवढा अंतर्मुख, तेवढा तो शरणागतीस लवकर पात्र होतो.
५. साधकाचा ‘अहंकार’ जितक्या वेळा हरतो, तितक्या वेळा तो गुरुचरणांच्या अधिकाधिक जवळ जातो. ईश्वरास अहंकाराचे दान करून शरणागती पत्करली की, ईश्वराचे विराटपण अनुभवास येते.
६. शरणागत साधकातील स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे दायित्व भगवंत (गुरु) स्वीकारतो. ‘शरणागती’ ही चित्त शुद्ध आणि विशाल करणारी कृती आहे.
७. शरणागत साधकास जगण्याचा कंटाळा येत नाही किंवा मरणाची भीतीही वाटत नाही.
८. शरणागती म्हणजे आपला जीव भगवंतात किंवा गुरुचरणांत विरघळवणे.
– (पू.) शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.२.२०२३)
जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच होय !
साधना, परिपूर्ण सेवा आणि गुरुकृपा दर्शवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयीचे भावमोती !
प्रामाणिक प्रयत्न करतो तो शिष्य !
‘गुरूंच्या संकल्पाने शिष्याची आध्यात्मिक प्रगती होणे’, हीच गुरुकृपा !
भक्ती ही कृती नसून २४ घंटे असणारी वृत्ती असणे
भावामुळे अद्वैतापर्यंतचा प्रवास होतो