
‘शिष्य म्हणजे मायेतील विषयांच्या ठिकाणी जो रमत नाही, ज्याचे अवगुण हळूहळू गेलेले आहेत आणि ज्याला सद्गुरु भेटलेले आहेत तो ! शिष्य त्यांच्या उपदेशाप्रमाणे यथामती चालण्याचा प्रयत्न करतोे. संसारापासून सुटलेला आहे; पण पैलतीर अजून पाहिलेला नाही, त्याचे नाव शिष्य. आपल्याला जे मिळवायचे आहे, त्या आत्मरूपदर्शनासाठी शिष्य जाणीवपूर्वक प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. तो कुणाचेही मन दुखवत नाही. कुणाला त्रास होईल, असे वागत नाही. त्याचे वागणे-बोलणे सौम्य अन् हळूवार असते. त्याची रहाणी स्वच्छ, निरामय असते.’
– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. (वर्ष १९९१)
जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच होय !
साधना, परिपूर्ण सेवा आणि गुरुकृपा दर्शवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयीचे भावमोती !
‘शरणागतभाव’ येण्यासाठी प्रक्रिया राबवतांना शिकायला मिळालेली सूत्रे
‘गुरूंच्या संकल्पाने शिष्याची आध्यात्मिक प्रगती होणे’, हीच गुरुकृपा !
भक्ती ही कृती नसून २४ घंटे असणारी वृत्ती असणे
भावामुळे अद्वैतापर्यंतचा प्रवास होतो