
‘एकदा मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यानंतर ध्यानमंदिरात बसून नामजप करत होतो. तेव्हा माझ्या मनात ‘गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) सत्संगात सर्व साधकांशी प्रेमाने आणि आपुलकीने बोलत होते; मात्र मी साधकांमध्ये भेदभाव करतो. गुरुदेव सर्वांशी प्रेमाने बोलतात. मीच साधकांमध्ये भेदभाव का करतो ? मला सर्वांशी समभावाने का वागता येत नाही ? ‘प्रत्येक साधकाचे दायित्व काय आहे ?’, हे पाहून मी त्यांच्याशी बोलतो’, असे विचार आले.

तेव्हा मला वाटले, ‘साधक कुणीही असो, प्रत्येकाशी समभावाने वागता यायला हवे. ‘प्रत्येक साधकात गुरूंचा अंश आहे’, असा भाव ठेवता यायला हवा.’
मी गुरुदेव, सद्गुरु आणि संत यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. श्रीनिवास गावस्कर, उडुपी, कर्नाटक. (३०.८.२०२४)
धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची झालेली ही वाईट स्थिती !
हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अंतर्गत सेवा करतांना अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांनी गुणवृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे !
विदेशातील रज-तम वातावरणात राहूनही शेवटच्या क्षणापर्यंत साधना करणार्या मोझांबिक (आफ्रिका खंड) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सरलाबाय जसवंतलाल रघुवंशी (वय ८७ वर्षे) !
‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञ ‘ऑनलाईन’ पहातांना यज्ञातील चैतन्याची साधकाला आलेली प्रचीती !
मुंबईत सनातन संस्थेच्या वतीने झालेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या वेळी साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
शिष्यापेक्षा गुरूंची साधना पुढच्या टप्प्याची !