शहरातील भूमीच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी

कुडाळ – येथील नगरपंचायतीच्या सीमेतील भूमीच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणी प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने कुडाळ नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ. संध्या प्रसाद तेरसे यांनी थेट प्रशासनाच्या विरोधात उपोषणाचे हत्यार उपसले आहे. शुक्रवार, १० जुलै या दिवशी सकाळी ९ वाजल्यापासून नगरपंचायत कार्यालयासमोर त्या उपोषणास बसणार आहेत. याविषयीचे लेखी निवेदन सौ. तेरसे यांनी कुडाळ नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्यांना दिले आहे.
कुडाळ नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील भूमीच्या गैरव्यवहाराविषयी २ जुलै २०२६ या दिवशी जिल्हाधिकार्यांकडे रीतसर तक्रार केली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती, तसेच यासाठी १० जुलैपर्यंतचा कालावधी दिला होता; मात्र अद्यापपर्यंत जिल्हाधिकारी किंवा संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून कोणतीही चौकशी अथवा ठोस कारवाई झालेली नाही. प्रशासनाच्या उदासीन कारभाराच्या विरोधात नाईलाजास्तव उपोषण करावे लागत आहे, असे सौ. तेरसे यांनी निवेदनात म्हटले आहे.
संपादकीय भूमिका :लोकप्रतिनिधींना उपोषणास भाग पाडणारे प्रशासन सामान्य जनतेशी कसे वागत असेल, हे लक्षात येते ! |
‘कॅप्टन ऑफ पोर्ट्स’ची यापुढे ‘गोवा मेरीटाइम बोर्ड’ म्हणून ओळख
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती
पालकांचा कल सरकारी शाळांऐवजी अनुदानित आणि खासगी शाळांकडे
केवळ ओळखपत्रधारकांनाच मासेविक्रीची अनुमती ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
गोव्यात नोंदणीकृत श्री गणेशमूर्ती विक्रेत्यांपैकी २७ टक्के विक्रेते मूर्तीमध्ये १५ ते २० टक्के प्लास्टर ऑफ पॅरिस वापरतात !
देवस्थानांचे संरक्षण, शासकीय भूमी मुक्तीसाठी प्रयत्न, धर्मांतरविरोधी लढा आणि व्यापक जनजागृती !