‘सौ. सुप्रिया माथूर (आध्यत्मिक पातळी ६७ टक्के, वय ४३ वर्षे) या स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणार्या साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. त्या माझा व्यष्टी साधनेचा आढावा घेत असतांना मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. स्वतःच्या, तसेच साधकांच्या साधनेविषयी तत्त्वनिष्ठ
‘सौ. सुप्रिया माथूर नेहमीच स्वतःविषयी, तसेच ‘इतर साधकांची साधना आणि सेवा’ यांविषयी तत्त्वनिष्ठ असतात. सुप्रियाताई साधकाला त्याच्या प्रत्येक चुकीविषयी अंतर्मुखतेने अन् गांभीर्याने जाणीव करून देतात.
२. सुस्पष्ट बोलणे

त्यांच्यात स्पष्टवक्तेपणा आहे. त्यांचे बोलणे नेहमीच सुस्पष्ट असते. त्यामुळे साधकाला ते त्वरित आकलन होते आणि समजून घेण्यास सोपे जाते.
३. त्यांच्यामध्ये पुष्कळ नम्रता असून त्या क्षमाशीलही आहेत.
४. चुकांविषयी संवेदनशील
त्यांच्याकडून एखादी कृती करतांना चूक झाली, तर त्या लगेचच संबंधित साधकाची क्षमायाचना करतात. हे मला २ वेळा अनुभवता आले.
५. प्रेमभाव
मी काही दिवस सुप्रियाताईंच्या समवेत पहाटे सेवेला जात होतो. त्या वेळी त्या सर्वांसाठी प्रथम चहा बनवत असत. ‘मी दुधाचा चहा पिण्याचे बंद केले आहे. मला कोरा चहा आवडतो’, हे त्यांना समजल्यावर त्या माझ्या एकट्यासाठी वेगळा चहा करून घेऊन येत असत. मी त्यांना ‘मला चहा नसला, तरी चालतो’, असे सांगूनही त्या माझ्यासाठी चहा करत असत. त्या मला ‘चहा कसा झाला आहे ?’, असे विचारत असत. एखाद्या वेळी त्या ‘माझ्याकडून आज चहात चहापावडर किंवा साखर अल्प झाली आहे’, असे सांगून माझी क्षमा मागत असत.
६. नामजपादी उपायांचे गांभीर्य
त्या सेवेत कितीही व्यस्त असल्या, तरीही नामजपादी उपाय सतर्क राहून पूर्ण करतात.
७. निर्णयक्षमता
त्या अन्नपूर्णाकक्षात सेवेला असतांना संबंधित साधकांना त्या त्या वेळी निर्णय देतात आणि साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेण्याची सेवा तेवढ्याच स्थिरतेने आणि लक्षपूर्वक करतात.
८. त्या साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेत असतांना साधकांच्या स्थितीप्रमाणे त्यांच्यामध्ये तारक आणि मारक या दोन्ही दैवी रूपांचे दर्शन अनुभवता येते.’
– श्री. गौतमेश अनिल तोरस्कर, कोल्हापूर (१४.४.२०२६)
ईश्वरप्राप्तीसाठी साधना प्रथम आणि नंतर तात्त्विक माहितीचे वाचन
योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी त्यांच्या भक्तांना नागदेवतेचे दर्शन घडवल्याच्या संदर्भातील अनुभूती !
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !
रुग्णाईत स्थिती स्थिर राहून स्वीकारणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेले फोंडा, गोवा येथील श्री. श्रीहरि मामलेदार (वय ६७ वर्षे) !
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
साधकांना सूचना : साधकांनो, पुढील पिढ्या घडवण्यासाठी तुमचे साधनेतील अनुभव नियमित लिहून द्या !