२३ वर्षांपूर्वी परात्पर गुरुदेवांनी ‘गाडगीळबाईंना (श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना) भेटून या, तुम्हाला आनंद मिळेल’, असे साधकांना सांगणे आणि साधकांनी ते अनुभवणे

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

‘वर्ष २००३ मध्ये श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या साधनेमध्ये नवीनच होत्या. या काळात सनातनचे सेवाकेंद्र फोंडा (गोवा) येथील ‘सुखसागर’ येथे होते. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ईश्वरी ज्ञान प्राप्त करून त्याचे संगणकीय टंकलेखन करण्याची सेवा करत असत.

परात्पर गुरुदेवांना कुणी साधक बाहेरून भेटण्यासाठी येत असत. त्या वेळी ते साधकांना आवर्जून सांगत, ‘‘गाडगीळबाईंना भेटून या. तुम्हाला आनंद मिळेल’’, तसेच ‘त्या ज्ञानाची सेवा कशी करतात ?’, हेही पहाण्यास सांगत. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे एक वैशिष्ट्य, म्हणजे त्यांना भेटण्यास कुणीही आले, तर त्या त्यांना आवर्जून भेटतात. त्यांना साधकांचा संग पुष्कळ आवडतो. स्वतःचे काहीही महत्त्वाचे कार्य चालू असेल, तर ते थांबवून समष्टीला प्राधान्य देतात. ‘त्यांच्या रूपात देवच येतो’, असा त्यांचा भाव असतो आणि तातडीच्या सेवांमध्ये व्यस्त असल्या, तरी त्या अगदी प्रेमाने सांगतात, ‘‘नंतर नक्की भेटते.’’ त्यांची काही कारणास्तव भेट झाली नाही किंवा प्रत्यक्ष बोलायला मिळाले नाही, तरी त्यांचा आनंदी चेहरा पाहूनही साधकांना आनंद मिळतो; म्हणूनच परात्पर गुरुदेव साधकांना ‘गाडगीळबाईंना भेटून या. तुम्हाला आनंद मिळेल’, असे म्हणायचे.’

– एक साधक