
१. गुरुदेवांच्या कृपेने वाईट शक्तीपासून रक्षण होणे
‘एकदा मी रात्री घरी झोपलो असतांना रात्री १२ वाजता माझ्या झोपण्याच्या जागेजवळ असलेल्या एक लाकडी पटलावर जोराने आघात केल्यासारखा आवाज झाला. तेव्हा मी लगेच जागा झालो. मला जवळच एका मोठ्या वाईट शक्तीचा चेहरा दिसला. मी त्या शक्तीला मारायला गेलो; पण ती शक्ती माझ्या हाती लागली नाही.

ती शक्ती माझ्याजवळ असलेल्या प.पू. भक्तराज महाराज, त्यांचे शिष्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्रांकडे आणि श्रीकृष्णाच्या चित्राकडे पहात मागे सरकली अन् दिसेनाशी झाली. ‘गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने माझे रक्षण झाले’, असे मला वाटले आणि माझी भावजागृती झाली.
२. सेवेनिमित्त दुचाकी गाडी वापरल्यावर सेवा संपवून घरी जात असतांना ‘दुचाकी गाडी पाण्यावरून तरंगत चालली आहे’, असे जाणवणे
मला ग्रंथप्रदर्शन लावण्याची सेवा मिळाली आहे. मी दुचाकी गाडीवरून ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने घेऊन जातो. मी सेवा संपवून घरी परत जात असतांना माझी दुचाकी गाडी सात्त्विक झाल्यासारखी वाटते. माझ्या दुचाकी गाडीचा वेग वाढल्यासारखा वाटतो. ‘दुचाकी गाडी पाण्यावरून तरंगत चालली आहे’, असा मला अनुभव येतो. एरव्ही दुचाकी गाडीचा वेग अल्प असल्याचा, तसेच दुचाकी गाडी चालवतांना त्रास होत असल्याचा मला अनुभव येतो. अशी अनुभूती मला प्रत्येक सेवेच्या वेळी येते.’
– श्री. सुंदर एम्.के., उजिरे, दक्षिण कन्नड, कर्नाटक. (३.७.२०२४)
हिंदूंची स्थिती अत्यंत केविलवाणी होण्याचे हे आहे कारण
या साधकांनो, परत फिरा रे, घराकडे अपुल्या !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
‘संतांना ‘जगण्याचा कंटाळा आला आहे’, असे जे वाटते, ती त्यांची स्वेच्छा आहे कि ईश्वरेच्छा आहे ?’, हे ओळखण्यासाठीची लक्षणे
पू. श्रीमती सुमन नाईक (सनातनच्या ६२ व्या संत, वय ७७ वर्षे) यांनी साधकांना केलेले भावपूर्ण मार्गदर्शन !