मडगाव रेल्वेस्थानकाजवळ जीवघेणा खड्डा !

 

मडगाव रेल्वेस्थानकाच्या रस्त्यासमोरील पदपथावर असलेला खड्डा (छायाचित्रकार  : श्री. महादेव नाईक)

मडगाव – येथील रेल्वेस्थानकाच्या समोरील रस्त्यावरील पदपथावर (फूटपाथवर) अनुमाने १ चौरसमीटर लांबी-रुंदीचा आणि २-३ फूट खोल खड्डा निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी अंधारात कोणताही पादचारी किंवा नागरिक यात पडून जीव गमावण्याची दाट शक्यता आहे. हा खड्डा कुणी खणला आहे कि तो निर्माण होण्यामागे पाऊस हे कारण आहे, ते शोधून प्रशासनाने हा खड्डा त्वरित बुजवणे आवश्यक आहे.

(वाचकांनी आपल्या परिसरात अशा प्रकारच्या समस्या असल्यास दैनिक ‘सनातन प्रभात’ला कळवाव्या. व्हॉट्सॲप संपर्क : ८१८०९६८०६९ – संपादक)