अमेरिकेचा इराणसमवेतचा युद्धबंदी करार समाप्त ! – Donald Trump

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांची घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन (अमेरिका) – मला वाटते की, इराणसमवेत झालेला करार आता संपला आहे. त्यांच्याशी चर्चा करणे म्हणजे केवळ वेळ वाया घालवणे आहे, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदी करार समाप्त केल्याची घोषणा केली.

ट्रम्प पत्रकार परिषदेत बोलतांना म्हणाले की,

इराणने करारातील अटींचा आदर केला नाही. तो खोटारडा आहे. आम्ही एक करार केला होता, ज्यावर सर्व जण सहमत होते. अण्वस्त्रे बनवली जाणार नाहीत, असे स्पष्ट ठरले होते; परंतु करार झाल्यानंतर त्यांनी बाहेर जाऊन प्रसारमाध्यमांना सांगितले की, या सूत्रावर आमची कधी चर्चाच झाली नव्हती. त्यांच्यात काहीतरी नक्कीच गडबड आहे. ते पूर्णपणे वेडे झाले आहेत.

तज्ञांच्या मते, ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर आखाती देशांतील परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. आधीच क्षेपणास्त्रे आक्रमणे, ड्रोन आक्रमणे आणि सागरी सुरक्षा यांवरून या भागात तणाव निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत जर दोन्ही देशांमधील सैनिकी कारवाई पुन्हा तीव्र झाली, तर त्याचा परिणाम जागतिक ऊर्जा पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावरही होऊ शकतो.