वास्को येथे जीर्ण इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना

वास्को, ७ जुलै (वार्ता.) – शहरातील एका जुन्या आणि जीर्ण इमारतीचा स्लॅब कोसळण्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. या पार्श्वभूमीवर वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी मुरगाव पालिका अधिकार्यांसमवेत घटनास्थळाची प्रत्यक्ष पहाणी केली आणि सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनवणार्या इमारतीच्या मालकांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
शहरातील प्रसिद्ध ‘दामोदर सप्ताह’ उत्सव अगदी तोंडावर आलेला असल्याने कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित मालकाने ही इमारत स्वत:हून पाडण्याची सिद्धता दर्शवली आहे; मात्र शहरातील इतर जीर्ण इमारतींचा प्रश्न अजूनही कायम आहे. आमदार कृष्णा साळकर म्हणाले, ‘‘कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी मुरगाव पालिकेने सर्व धोकादायक वास्तूंचे सर्वेक्षण करून संबंधितांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. केवळ नोटिसा बजावून न थांबता आता थेट कारवाई करावी. अशा जीर्ण इमारतींच्या मालकांवर फौजदारी गुन्हे नोंद करावे.’’
अवे, खोतीगाव येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानाच्या नूतनीकरणाचे अहिंदूच्या नावाने दिलेले कंत्राट रहित
वादळ आणि पाऊस यांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६७ गावांमधील वीजपुरवठा खंडित
मडगाव रेल्वेस्थानकाजवळ जीवघेणा खड्डा !
कबुतरांद्वारे पसरणार्या फुफ्फुसांच्या व्याधींविषयी तज्ञांची समिती स्थापन करावी ! – राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा
८ जुलैपासून पावसात घट; शेतकर्यांनी हवामानानुसार शेतीचे नियोजन करावे ! – कृषी विभाग
तुकाराम मुंढेंच्या धडक कारभाराने यंत्रणा गतीमान !