शाळा चालू होऊन १५ दिवस झाले

पिंपरी (पुणे) – महापालिका आणि ‘आकांक्षा फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने इंग्रजी माध्यमांच्या शाळातील अनुमाने १ सहस्र २८० विद्यार्थ्यांना शाळा चालू होऊन १५ दिवसांनंतरही पाठ्यपुस्तके मिळालेली नाहीत. विद्यार्थ्यांना लवकर पाठ्यपुस्तके मिळावीत. या दिरंगाईस दायित्व असलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? या प्रकरणाची आयुक्तांनी तातडीने चौकशी करणे आवश्यक आहे ! – संपादक)
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ‘आकांक्षा फाऊंडेशन’कडून वर्ष २०१३ पासून काही शाळा चालवण्यात येतात. या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतचे पूर्णत: विनामूल्य शिक्षण दिले जाते. मागील २ वर्षांपासून शाळांना शालेय पाठ्यपुस्तकांची मागणी करूनही विभागांकडून वेळेत पुरवठा केला जात नाही. समयमर्यादेत विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली पाहिजेत. ही दिरंगाई का केली जाते ? याचे अन्वेषण करावे, अशी मागणीही वाघेरे यांनी केली आहे.
सी.बी.एस्.ई., आय.सी.एस्.ई. शाळांवर राज्य सरकारला नियंत्रण ठेवता येत नाही ! – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रचार, प्रसिद्धी करा ! – शीतल तेली, विभागीय आयुक्त
राजभवनात पोलीस हवालदाराची आत्महत्या !
नवी मुंबईत अपघातात दोघांचा मृत्यू
ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पर्यटकांवर बंधने !
मावळ तालुक्यातील विसापूर दुर्गावर सापडली अपरिचित लेणी !