ED Freezes TMC Deposits : अंमलबजावणी संचालनालयाने तृणमूल काँग्रेसशी संबंधित ३ बँक खाती गोठवली

खात्यांमध्ये ४४० कोटी रुपये आहेत जमा  !

कोलकाता (बंगाल) – अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) तृणमूल काँग्रेसशी संबंधित कोलकाता येथील ३ बँक खाती गोठवली आहेत. या खात्यांमध्ये ४४० कोटी रुपये जमा आहेत. तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर आमदारांच्या एका गटाने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या खात्यांमधून होणारे सर्व व्यवहार आणि पैसे काढण्यावर बंदी घातली होती. या बंडखोर गटाचे नेतृत्व ऋतब्रत बॅनर्जी करत आहेत. आता ईडीने हे प्रकरण त्याच्या हाती घेऊन तपासाची व्याप्ती वाढवली आहे.

ईडीच्या प्राथमिक तपासानुसार १५० कोटी रुपयांपेक्षा अधिक संशयास्पद निधी हा विमान वाहतूक आणि ट्रॅव्हल आस्थापने यांच्या माध्यमातून पाठवला गेला होता. या बँक खात्यांचा वापर भ्रष्टाचार, खंडणी वसुली किंवा स्थानिक तस्करीतून कमावलेला पैसा लपवण्यासाठी केला गेला होता का ?, याचे अन्वेषण यंत्रणा अत्यंत सखोलपणे करत आहे.