
पंढरपूर – आषाढी यात्रेसाठी येणारे लाखो वारकरी भाविक आणि स्थानिक नागरिक यांना वाहतुकीचा त्रास होऊ नये, यासाठी पंढरपूर नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे ३० जूनपासून शहरातील प्रमुख मार्गांवरील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ केला.
मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी अन् कर्मचारी जेसीबी, ट्रॅक्टर आणि टेंपो यांच्या साहाय्याने कारवाई करत आहेत. पूर्वसूचना देऊनही अतिक्रमण न हटवणार्या व्यापार्यांवर ही कारवाई करण्यात येत आहे. आषाढी यात्रेसाठी सुमारे १८ ते २० लाख भाविक पंढरपर येथे येण्याचा अंदाज असून शहरातील सर्व भागांतील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम पुढेही चालू रहाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
कातळशिल्पांचे पूर्ण संरक्षण करूनच विकास प्रकल्प राबवणार ! – माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अधिवक्ते आशिष शेलार
सी.बी.एस्.ई., आय.सी.एस्.ई. शाळांवर राज्य सरकारला नियंत्रण ठेवता येत नाही ! – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
अवे, खोतीगाव येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानाच्या नूतनीकरणाचे अहिंदूच्या नावाने दिलेले कंत्राट रहित
जीर्ण इमारतींच्या मालकांवर गुन्हा नोंदवण्याची आमदार साळकर यांची मागणी
वादळ आणि पाऊस यांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६७ गावांमधील वीजपुरवठा खंडित
मडगाव रेल्वेस्थानकाजवळ जीवघेणा खड्डा !