एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्‍या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक किती, हे बघून त्यानुसार अधिक असलेल्या कारणासाठी प्रथम उपाय द्यावेत !

‘एखादा साधक त्याला स्वतःला होणार्‍या शारीरिक त्रासासाठी उपाय विचारतो. त्या वेळी साधकाला होणार्‍या शारीरिक त्रासाचे कारण शारीरिक आणि आध्यात्मिक, असे दोन्ही असू शकते. त्यामुळे प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधतांना दोन्ही कारणांसाठी उपाय शोधावे लागतात. शोधलेल्या दोन्ही उपायांपैकी आधी शारीरिक त्रास दूर होण्यासाठी उपाय करायचे कि आधी आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी उपाय करायचे, हे ‘शारीरिक आणि आध्यात्मिक कारणांचे प्रमाण एकूण १०० टक्के प्रमाणापैकी किती टक्के आहे ?’, यावर पुढीलप्रमाणे अवलंबून असते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. शारीरिक कारण अधिक प्रमाणात असणे

समजा होणार्‍या शारीरिक त्रासाला कारणीभूत शारीरिक कारण ७० टक्के आणि आध्यात्मिक कारण ३० टक्के असेल, तर शारीरिक कारण दूर करण्यासाठी शोधून दिलेला उपाय आधी करण्यास सांगावा. त्यामुळे वेदनांचे प्रमाण उणावेल. शारीरिक उपाय करून झाल्यावर आध्यात्मिक कारण दूर करण्यासाठी दिलेला उपाय करण्यास सांगावा.

२. आध्यात्मिक कारण अधिक प्रमाणात असणे

होणार्‍या शारीरिक त्रासाला कारणीभूत आध्यात्मिक कारण ७० टक्के आणि शारीरिक कारण ३० टक्के असेल, तर आध्यात्मिक कारण दूर करण्यासाठी शोधून दिलेला उपाय आधी करण्यास सांगावा. त्यामुळे शारीरिक त्रासाला कारणीभूत असलेले मूळ कारण आधी दूर होईल.

३. शारीरिक आणि आध्यात्मिक कारणाचे प्रमाण साधारण एकसारखेच असणे

समजा शारीरिक त्रासाला कारणीभूत शारीरिक कारण ४५ ते ५० टक्के आणि आध्यात्मिक कारण ५५ ते ५० टक्के, म्हणजे साधारण एकसारखेच असेल, तर कोणता उपाय आधी करण्यास सांगायचा हे तारतम्याने ठरवावे. शारीरिक त्रासाचे लक्षण तीव्र स्वरूपात असेल, तर आधी शारीरिक उपाय करण्यास सांगावा आणि शारीरिक त्रासाचे लक्षण मध्यम, म्हणजे सहन होईल असे असेल, तर आधी आध्यात्मिक उपाय करण्यास सांगावा.

एखाद्याला मानसिक त्रास होत असतांनाही त्याला कारणीभूत मानसिक कारण आणि आध्यात्मिक कारण यांचे प्रमाण किती आहे, हे शोधावे. या दोन्ही कारणांसाठी वेगवेगळे उपाय प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार शोधून मिळतात. तेव्हाही वर दिल्याप्रमाणे मानसिक आणि आध्यात्मिक कारण यांच्या प्रमाणानुसार आधी कोणता उपाय करण्यास सांगायचा, हे ठरवावे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (३.७.२०२६)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.