अमेरिकेच्या अन्वेषण यंत्रणांनी कॅनडाचा खोटा दावा केला उघड !
हत्येमध्ये लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार टोळीचा हात

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेच्या अन्वेषण यंत्रणांनी कॅनडात झालेल्या खलिस्तानी आतंकवादी हरदिपसिंह निज्जर हत्या प्रकरणाविषयी मोठा खुलासा केला आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने, ‘भारताच्या कारागृहात बंद असलेल्या लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी बरार टोळीने निज्जरच्या हत्येचा कट रचला होता’, असा दावा केला आहे. यामुळे यात भारताचा कोणताही सहभागी नाही, असे स्पष्ट झाले आहे. निज्जर हत्या प्रकरणावरून कॅनडाने भारतीय दूतावासातील अधिकार्यांवर आरोप केले होते आणि यामुळे भारतासोबतचे संबंध अत्यंत ताणले गेले होते. कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी संसदेत दावा केला होता की, कॅनडाच्या यंत्रणांकडे अशा गुप्तचर माहिती आहेत, ज्यावरून निज्जर हत्या प्रकरणात भारताचा हात असल्याचे दिसून येते. यावर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती आणि हे आरोप निराधार असल्याचे सांगत ठोस पुरावे सादर करण्यास सांगितले होते.
या संदर्भात न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे. आरोपपत्रानुसार ३ वर्षांपूर्वी १८ जून या दिवशी कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियामधील एका गुरुद्वाराबाहेर हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. या आरोपपत्रात भारतात अनेक गुन्ह्यांना सहभागी असणार्या लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी बरार, रोहित गोदारा आणि जग्गू भगवानपुरिया यांच्या नावांचाही समावेश आहे. या टोळ्या केवळ भारतातच सुपारी घेऊन हत्या करणे, अमली पदार्थ आणि शस्त्रे यांची तस्करी, खंडणी वसुली आणि आर्थिक गैरव्यवहार इतकेचे गुन्हे करत नाही, तर अमेरिका, कॅनडा, युरोपीय देशांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांपर्यंत त्यांची पाळेमुळे पसरलेली आहेत.
अमेरिकेची जागतिक कारवाई
अमेरिकेची एफ्.बी.आय. या अन्वेषण यंत्रणेने जागतिक पातळीवर कारवाई करत लॉरेन्स बिश्नोईसह अनेक टोळ्यांविरुद्ध ७ जुलै २०२६ या दिवशी मोहीम राबवली आणि सुमारे २४ लोकांना अटक केली आहे. यंत्रणांच्या माहितीनुसार १० आरोपी अद्याप पसार आहेत. यामध्ये अमेरिकेत ७, भारतात २ आणि युरोपमध्ये १ आरोपी लपून बसल्याची माहिती यंत्रणांकडे आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अमेरिकेतील १३ आरोपींचा समावेश आहे, ज्यामध्ये कॅलिफोर्नियामध्ये ११, इंडियानामध्ये एक आणि जॉर्जियामध्ये एक आरोपी आहे. कॅनडात ३ आणि स्पेनमध्ये एकाला अटक करण्यात आली आहे. यंत्रणांना १ सहस्र किलो कोकेन, १ किलो हेरॉईन, ४० सहस्र अमेरिकी डॉलर्स आणि १२ बेकायदेशीर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
Pakistan Plane Missing : पाकिस्तानचे मालवाहू विमान अचानक अरबी समुद्रावर झाले गायब !
PM Modi Indonesia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्लामी देश इंडोनेशियातील सर्वांत मोठ्या आणि प्राचीन हिंदु मंदिराला दिली भेट
अमेरिकेचा इराणसमवेतचा युद्धबंदी करार समाप्त ! – Donald Trump
(म्हणे) ‘पाकिस्तान सिंधु जल वाटप कराराच्या प्रकरणी प्रत्येक पातळीवर प्रयत्न करील !’ – Asim Munir
भारतीय वंशाच्या व्यक्तीने इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींची फसवणूक केल्याचा आरोप
Karnavati Blasts 2008 : ३८ जिहादी आतंकवाद्यांची फाशी अन् ११ जणांची जन्मठेप गुजरात उच्च न्यायालयाने ठेवली कायम !