भारत आणि इंडोनेशिया मिळून करणार मंदिराचा जीर्णाेद्धार

जकार्ता (इंडोनेशिया) – जगातील सर्वाधिक मुसलमान रहात असणार्या इस्लामी देश इंडोनेशियाच्या दौर्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ जुलै या दिवशी योग्याकार्ता येथे असलेल्या ‘प्रंबनन’ या सर्वांत मोठ्या प्राचीन हिंदु मंदिराला भेट दिली. या वेळी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो त्यांच्यासमवेत होते. या दोन्ही नेत्यांनी मंदिराच्या जतन आणि जीर्णोद्धार प्रकल्पाचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी मंदिरात पूजाही केली.
या वेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करतांना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘मला नेहमीच कोणत्या ना कोणत्या रूपात भगवान शिवाशी जोडले जाण्याची संधी मिळाली आहे. सोमनाथ, काशी विश्वनाथ, केदारनाथ धाम आणि उज्जैनमधील महाकाल मंदिरानंतर आता प्रंबनन मंदिराच्या विकासकार्यात योगदान देण्याची संधी मिळणे, हे माझे सौभाग्य आहे. मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो.’’
President Prabowo Subianto and I inaugurated the UNESCO World Heritage Prambanan Temple Compound Restoration and Conservation Project. This initiative is a shining example of the enduring civilisational bonds between India and Indonesia, rooted in a shared heritage that has… pic.twitter.com/Fy8FoBvJ8X
— Narendra Modi (@narendramodi) July 8, 2026
वर्ष २०२९ मध्ये जीर्णाेद्धाराचे काम पूर्ण झाल्यावर पुन्हा इंडोनेशियाला येणार !
पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की, या मंदिराच्या जीर्णाेद्धाराचे काम वर्ष २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी राष्ट्रपती प्राबोवो यांना दिले आहे आणि हे काम पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मी पुन्हा इंडोनेशियाला येईन, असे वचनही त्यांनी दिले आहे.
प्रंबनन मंदिराचा इतिहास
इंडोनेशियातील जावा बेटावर योग्याकार्ताजवळ स्थित असलेले प्रंबनन मंदिर आग्नेय आशियातील दुसर्या क्रमांकाचे सर्वांत मोठे हिंदु मंदिर आहे. कंबोडियातील ‘अंगकोर वाट’ हे मंदिर प्रथम क्रमांकावर आहे. प्रंबनन मंदिर संकुल १ सहस्र वर्षे जुने आहे.
या संकुलात एकेकाळी सुमारे २४० मंदिरे होती. येथे ‘त्रिमूर्ती’ला म्हणजेच भगवान शिव, विष्णु आणि ब्रह्मा यांना समर्पित अशी ३ मुख्य मंदिरे आहेत. त्यांपैकी ४७ मीटर उंच असलेले शिव मंदिर हे सर्वांत मोठे आहे. या मंदिराच्या भिंतींवर रामायण आणि इतर हिंदु धर्मग्रंथांमधील कथा कोरलेल्या आहेत.
Pakistan Plane Missing : पाकिस्तानचे मालवाहू विमान अचानक अरबी समुद्रावर झाले गायब !
अमेरिकेचा इराणसमवेतचा युद्धबंदी करार समाप्त ! – Donald Trump
(म्हणे) ‘पाकिस्तान सिंधु जल वाटप कराराच्या प्रकरणी प्रत्येक पातळीवर प्रयत्न करील !’ – Asim Munir
Nijjar Murder Case : खलिस्तानी आतंकवादी निज्जर याच्या हत्येत भारतीय अधिकार्यांचा कोणताही हात नव्हता !
‘मुस्लिम पर्सनल लॉ’ देशाच्या कायद्यापेक्षा वरचढ नाही ! – Allahabad High Court
Badrinath Temple Donation Theft : मंदिर समितीच्या अध्यक्षांचे खासगी सचिव प्रमोद नौटियाल निलंबित