लंडन/पॅरिस – युरोपमधील २३ देशांमध्ये यंदा विक्रमी उष्णतेची लाट नोंदवण्यात आली असून अनेक भागांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. त्यामुळे रुग्णालये, वीजपुरवठा, वाहतूक व्यवस्था आणि शेती यांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. विविध अंदाजांनुसार या उष्णतेमुळे २० सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. ‘एलियांज रिसर्च’च्या अंदाजानुसार या उष्णतेचा युरोपच्या अर्थव्यवस्थेला अनुमाने ११ लाख कोटी रुपयांचा फटका बसू शकतो. उत्पादनात घट, पिकांची हानी, पर्यटनावर परिणाम आणि पायाभूत सुविधांवरील ताण यांमुळे वर्ष २०३० पर्यंत ही हानी ६१ लाख कोटी रुपयांपर्यंत पोचण्याची शक्यता आहे.
पुढील वर्षी युरोपमधील ३४ टक्के लोकसंख्या पाण्यासाठी त्रस्त असेल !
युरोपीय पर्यावरण संस्थेच्या अंदाजानुसार पुढील वर्षी युरोपमधील अनुमाने ३४ टक्के लोकसंख्या पाणीटंचाईच्या संकटाला सामोरी जाऊ शकते. दक्षिण युरोपमध्ये हे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सीरियाची राजधानी दमास्कस जेथे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थांबले होते, त्या भागात लागोपाठ ४ बाँबस्फोट : ३ जणांचा मृत्यू
खेडमध्ये दरड कोसळली : एकास वाचवले अन्य दोघांचा शोध चालू
ओमानच्या समुद्रात एका नौकेवर क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण : इराणवर संशय
बांगलादेशाने भारताचा चुकीचा नकाशा दाखवला !
China Bribery Case : ३० वर्षांत ३ सहस्र कोटी रुपयांची लाच घेणार्या चीनच्या माजी अधिकार्याला फाशीची शिक्षा
Saudi Crude Oil : सौदी अरेबियाने तेलाच्या किमतीत केली कपात