- पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी – मुसळधार पावसामुळे ६ जुलैच्या रात्री खेड तालुक्यातील दहिवली येथे दरड कोसळली. मातीच्या ढिगार्याखाली ३ व्यक्ती अडकल्या, त्यांपैकी एका व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. तथापि अन्य २ व्यक्ती अद्याप बेपत्ता असून त्या ढिगार्याखाली दबल्या गेल्यामुळे त्यांच्या जिवंत असण्याची शक्यता अल्प असल्याचे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (‘एन्.डी.आर्.एफ्.’ने) कळवले आहे.

तरीही त्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. या दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या वारशांना शासनाच्या वतीने तातडीने ४ लाख रुपयांचे साहाय्य देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.
‘गोकुळ’च्या अपकिर्तीच्या विरोधात आज शेतकर्यांसमवेत आत्मक्लेश आंदोलन ! – डॉ. युवराज येडूरे, सामाजिक कार्यकर्ते
मावळ तालुक्यातील विसापूर दुर्गावर सापडली अपरिचित लेणी !
धोकादायक पर्यटनस्थळे, धबधबे, तलाव आणि नदीकाठच्या भागांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध !
पुणे महापालिकेची विक्रमी मिळकतकर वसुली : पहिल्या तिमाहीत १ सहस्र ३९५ कोटी !
ठाणे येथे गटाराच्या पाण्यात मक्याची कणसे धुतली
पुणे शहरात ६ दिवसांत पडला महिन्याभराचा पाऊस !