कर्नाटक : २३० भ्रमणभाष, १७ घातक शस्त्रे आणि गांजा बाळगणार्‍या धर्मांधास अटक

आरोपी अकबर शरीफ

बेंगळुरू (कर्नाटक) – शहरातील विविध रस्त्यांवर रात्रीच्या वेळी संशयास्पदरित्या फिरणार्‍या अकबर शरीफ नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्याच्या दुचाकीची पडताळणी केली असता त्यात ५ घातक शस्त्रे सापडली. त्याच्या घराची झडती घेतली असता लपवून ठेवलेली विविध प्रकारची १७ घातक शस्त्रे, २३० भ्रमणभाष संच आणि ७०० ग्रॅम गांजा सापडला. पोलिसांनी हे सर्व जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

१. आरोपी अकबर शरीफ बॅटरायनपुरा रेल्वेस्थानकाजवळ गांजा विकत होता. ‘स्वतःच्या बचावासाठी मी घातक शस्त्रे बाळगत होतो’, असे त्याने चौकशीत सांगितले.

२. आरोपीने एवढे भ्रमणभाष संच कुठून चोरले, याच अन्वेषण पोलीस करत आहेत, असे  पश्चिम विभागाचे पोलीस उपायुक्त एन. यतीश यांनी सांगितले.

३. वर्ष २०२४ मध्ये गांज्याचा पुरवठा केल्याच्या आरोपावरून अकबर शरीफची आई मेहर उन्निसि हिला अटक करण्यात आली होती. त्या वेळी ४५ किलो गांजा जप्त करण्यात आला होता, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

या साहित्याचे आरोपी काय करणार होता ?, याचे अन्वेषण करून सत्य जनतेसमोर आले पाहिजे !