‘सिटीझन व्हिजिलान्टे’ : न्याय बंदुकीने करावा कि चांगुलपणा जपत त्याची वाट पहावी ?

‘सिटिझन व्हिजिलान्टे’ हा इंग्रजी भाषेतील चित्रपट पाहिला. या चित्रपटात एक प्रसंग आहे, जिथे चित्रपटाचा नायक (खलनायक) मायकल सँडर्स ज्या स्थलांतरितांनी बलात्कार केलेला असतो, त्यांची हत्या करत असतो. त्या प्रसंगातील संवाद फार उत्तम आणि बेधडक आहे.

चित्रपटाचे भित्तीपत्रक

१. बलात्काराचे समर्थन आणि धर्मांधांची वासनांध वृत्ती दर्शवणारा संवाद

युसूफ : मला क्षमा करा. आम्ही जे केले, त्यासाठी मला क्षमा करा. आम्हाला वाटले की, तिचीही इच्छा होती.

मायकल सँडर्स : तुला वाटले की… तिची इच्छा होती की, तुम्ही तिला पकडावे आणि पार्कमधील एका निर्जन ठिकाणी झाडांमध्ये ओढत न्यावे ? तिची इच्छा होती की, तू तिचे तोंड दाबावे आणि तुझ्या ७ मित्रांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार करावा ? या घटनेनंतर तुझ्या सोशल मिडियावर (समाजमाध्यमांवर) मला कोणताही पश्चात्ताप किंवा सहानुभूती दिसली नाही. उलट मला वाटते, तू असे लिहिले होते की, ती बलात्काराच्याच लायकीची होती.

युसूफची बहीण : माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की, त्या चुकीचे कपडे घालतात आणि त्यांच्या मिनी स्कर्ट्समुळे मुलांना आकर्षित करतात. त्या त्यांचे पाय आणि छाती दाखवतात.

मायकल सँडर्स : तू लिहिले होते की, ती याच लायकीची होती.

युसूफची बहीण : मी ते ‘डिलीट’ (नष्ट) करीन.

मायकल सँडर्स (इब्राहिमला) : तुम्ही तुमच्या मुलांना हेच संस्कार शिकवत आहात का ?

इब्राहिम : मी त्याला ‘कुराण’मधील मूल्ये आणि आमच्या कुटुंबाचे संस्कार शिकवतो.

मायकल सँडर्स : बरे, जर तुमचे संस्कार हेच आहेत की, अमेरिका आणि युरोप येथील महिला कपड्यांच्या पद्धतीमुळे बलात्काराच्या पात्र आहेत, तर मग तुम्ही इथे का आला ?

इब्राहिम : तुम्हाला ठाऊक आहे की, आमच्या देशात गृहयुद्ध चालू आहे आणि आमचे जीवन धोक्यात होते. म्हणूनच आम्ही इथे आलो आहोत आणि मला वाटते, तुम्हाला हे ठाऊक आहे.

मायकल सँडर्स : मला काय वाटते ठाऊक आहे ? मला नाही वाटत की, तुमच्या देशातून चांगले लोक बाहेर पडले. मला वाटते, वाईट लोक बाहेर आले आहेत आणि तुम्ही तुमच्यासह तुमची जुनाट विचारसरणी अन् लोकशाही किंवा कायद्याच्या राज्यापेक्षा ‘रिलिजन’ला (पंथाला) वरचढ मानण्याची वृत्ती समवेत घेऊन आला आहात.

यानंतर मायकल सँडर्स युसूफसह सर्वांना गोळ्या घालतो.

२. बलात्काराचे न्यायालयाने समर्थन केल्यास कायद्याला अर्थ राहील का ?

श्री. प्रसन्न शिवराम बर्वे

‘सिटिझन व्हिजिलान्टे’ चित्रपटावर जर्मनीने बंदी घातली आहे. अन्य युरोपीय देशही त्याच मार्गावर आहेत. या चित्रपटाची कथा युरोपीय देशांत निर्वासित म्हणून आश्रय घेतलेल्या इस्लामी लोकांनी चालू केलेले अत्याचार आणि त्यांची तेथील न्यायव्यवस्था अन् प्रशासन यांनी केलेली पाठराखण यांतून निर्माण झालेल्या असंतोषावर आधारित आहे. यात अनाम नायक या सर्व गुन्हे आणि बलात्कार केलेल्या निर्वासितांची हत्या करतो. हे कृत्य अयोग्य कि योग्य ?, हा प्रश्न विचारणारे इस्लामच्या नावे केलेले अत्याचार आणि ‘ट्रॉमॅटिक इंटिग्रेशन’ (निर्वासित व्हावे लागल्याचा आघात झाल्यामुळे मानसिक संतुलन बिघडणे) या सबबीखाली गुन्हेगार सुटतात, त्यावर अवाक्षरही काढत नाहीत. कायदा हातात घेणे चुकीचेच आहे; पण जिथे ‘ट्रॉमॅटिक इंटिग्रेशन’ या नावाखाली बलात्कार करण्याचे समर्थन न्यायालयच करते, तिथे कायद्याला अर्थ काय उरतो ? ‘सिटिझन व्हिजिलान्टे’ जशी हाती बंदूक घेतो, तशी काश्मिरी हिंदूंनी घेतली नाही, हे त्यांचे चुकले का ?

३. युरोपीय देशांकडे ‘मिश्र संस्कृती’त जगणे, हाच एकमेव पर्याय !

जे आज युरोप आणि पाश्चिमात्य देश भोगत आहेत, ते भारताने सहस्रो वर्षे भोगले आहे. त्याला ‘मध्ययुगीन मानसिकता’ म्हणून झाकले गेले आणि तेच जेव्हा स्वतंत्र भारतात अनेकदा घडले, तेव्हा न्यायव्यवस्थेने ‘पुष्कळ काळ लोटल्याचे’ तकलादू कारण पुढे करत त्याची सुनावणीच नाकारली. भारत आज ‘मिश्र संस्कृती’चा देश म्हणून समाजवादी आणि साम्यवादी मिरवतात; पण आज जे पाश्चिमात्य देशांत चालू आहे, तो याचाच प्रारंभ आहे. पुढे या गोष्टी सामान्य झाल्या की, मिश्र संस्कृती म्हणून जगण्याविना युरोपीय देशांकडे पर्याय उरणार नाही. जे वसाहतवाद्यांनी भारतात केले आणि साम्यवादी-समाजवादी विचारसरणीने पांघरूण घातले, तेच भोगावे लागणे, हा ‘काव्यात्म न्याय’ (पोएटिक जस्टिस) आहे.

४. एकातरी काश्मिरी हिंदूने बंदूक उचलली का ?

निर्वासितांनी केवळ इस्लाममध्ये म्हटले म्हणून बलात्कार केल्याचे सत्य अक्षरश: लोकशाहीचे सर्व स्तंभ युरोपमध्ये झाकत आहेत. १४ जणांनी नवर्‍याच्या डोळ्यांसमोर बलात्कार केल्यानंतरही दुर्दैवाने जिवंत राहिलेल्या गिरिजा टिक्कू यांचा जिवंत देह करवतीने चिरण्यात आला होता. तिला आजवर साधा नैसर्गिक न्यायही मिळाला नाही. एकाही काश्मिरी हिंदूने या अत्याचाराच्या बदल्यात बंदूक उचलली नाही; पण त्यांचे कुणालाही काही पडलेले नाही.

५. …हे तर बलात्कार करण्याचा परवाना दिल्यासारखे !

युरोपमध्ये इस्लाममुळे होणार्‍या बलात्कारांना ‘सिटिझन व्हिजिलान्टे’ने बंदुकीतून दिलेल्या उत्तराचे कौतुक आम्ही तरी का करावे ? त्यांच्या न्यायव्यवस्थेला ‘ट्रॉमॅटिक इंटिग्रेशन’मुळे बलात्कार करणे सामान्य आणि समर्थनीय वाटत असेल, तर त्याचे दु:ख जगात कुणीच करू नये. जे ‘व्हिजिलान्टे’चा कायदा हातात घेण्याला विरोध करतात, ते केलेल्या बलात्कारातून ‘ट्रॉमॅटिक इंटिग्रेशन’मुळे सुटलेल्या इस्लामी निर्वासितांचा विरोध अन् त्यांना शिक्षा करण्याविषयी काहीही बोलत नाहीत, म्हणजे ज्याच्यावर अन्याय झाला आहे, त्याने शांत रहावे. हा एका अर्थाने युरोपने बलात्कार करण्यास दिलेला परवानाच (अनुज्ञप्ती) आहे.

६. युरोपीय देशांनी ही वृत्ती स्वतःहून ओढवून घेतली !

स्वत:स ‘इस्लामोफोबिक’ (इस्लामद्वेषी) ठरवले जाण्याची भीती प्रत्येक युरोपीय देशाला आहे; पण त्यासाठी गुन्हेगारीला पाठीशी घालावे का ? याचे उत्तर एकाही देशाकडे नाही. एवढे इस्लामी देश असतांनाही सगळे मुसलमान निर्वासित उदारमतवादी युरोपीय देशांतच का जातात ?, याचा विचारही त्यांना शिवत नाही. ‘व्हिजिलान्टे’ पद्धतीने कायदा हाती घेण्याची बळावत चाललेली वृत्तीही युरोपीय देशांनी स्वत:हून ओढवून घेतलेली आहे.

७. संपूर्ण लोकशाही इस्लामला चळाचळा कापते ?

काश्मीरमध्ये हिंदूंना ‘केवळ हिंदु आहेत’ म्हणून मारण्यात आले, हे सत्य सांगण्याचे धाडस भारतीय लोकशाहीचा एकही स्तंभ करू शकत नाही. का ? याचे एकमेव कारण संपूर्ण लोकशाही इस्लामला चळाचळा कापते. स्वत:च्या संस्कृतीचे नाणे राजकीय, सामाजिक आणि प्रत्येक क्षेत्रात ठणकावून वाजवावे लागते. अन्यथा नौखालीपासून काश्मीरपर्यंत नरसंहार होऊनही जगातील मानवतावादाला त्याचे काहीही सुवेरसुतक नसते. ‘व्हिजिलान्टे’प्रमाणे हाती शस्त्र न घेण्याच्या किंवा त्याविरुद्ध व्यक्तही न होण्याच्या चांगुलपणासही काहीच अर्थ नसतो.

– श्री. प्रसन्न शिवराम बर्वे, पणजी, गोवा.

(साभार : ‘प्रसन्न वदने’ ब्लॉगवरून)