
ऋष्यमूक पर्वतावर जेव्हा भगवान श्रीराम आणि हनुमान यांची पहिली भेट झाली, तेव्हा रामसेवक हनुमानाने श्रीरामचरणी त्याचा देह अर्पण केला. हनुमानाच्या दास्यभक्तीने त्याला श्रीरामाच्या हृदयात चिरस्थान प्राप्त करून दिले. तो आपल्या प्रभूच्या हितासाठी कधीही प्राण अर्पण करण्यास सिद्ध होता. श्रीरामाच्या सेवेपुढे त्याला मोक्षाची इच्छाही कवडीमोल वाटत असे. आपणही हनुमानाकडून ही शिकवण घेऊया आणि आपली उपास्यदेवता, इष्टदेवता किंवा कुलदेवता यांना अशाच प्रकारे शरण जाण्याचा प्रयत्न करूया. कारण त्या देवताच आपले सदैव रक्षण करत असतात !
अफाट शक्ती असूनही ‘श्रीरामाचा दास’ असा परिचय देणे !

आश्चर्य म्हणजे एवढी प्रचंड शक्ती असलेला, सद्गुणांचे आश्रयस्थान आणि साक्षात नम्रतेचे प्रतीक असणारा हनुमान स्वतःच सम्राट होऊ शकला असता. असे असूनही त्याने श्रीरामाचे दास्यत्व पत्करले !
हनुमानाकडे अफाट शक्ती, बुद्धी आणि सिद्धी होत्या; परंतु त्याने स्वतःची ओळख कधीही ‘शक्तीशाली’ म्हणून दिली नाही. जेव्हा त्याला विचारण्यात आले की ‘तुम्ही कोण आहात ?’, तेव्हा त्याने विनम्रपणे सांगितले, ‘दासोऽहं कोसलोंद्रस्य रामस्य अक्लिष्टकर्मणः ।’ म्हणजे ‘मी त्या अक्लिष्ट (सहजतेने) कर्मे करणार्या कोसलराज प्रभु श्रीरामांचा अनन्य दास हनुमान आहे.’ स्वतः एक उच्च देवता असूनही आपले देवत्व न स्वीकारता, श्रीरामजींची भक्ती करून स्वतःला ‘रामदास’ म्हणवून घेण्यात श्री हनुमानाने त्याचा गौरव मानला. ज्या वेळी अशोकवाटिकेतून हनुमानाला बंदी बनवून राजदरबारात रावणासमोर उभे करण्यात आले, त्या वेळी राक्षसांनी त्याला विचारले, ‘तू कोण आहेस? तुझा परिचय दे.’ प्रत्यक्षात श्री हनुमान ११ वा रुद्र, सूर्यनारायणाचा शिष्य, वायूपुत्र, वानरराज केसरी याचे राजपुत्र, सुग्रीवाचे मंत्री आणि प्रभु श्रीरामाचा परम भक्त होता; परंतु त्याने स्वतःचा यांपैकी कोणताही परिचय न देता हनुमान म्हणाला, ‘मी त्रिलोकाचे पती प्रभु श्रीरामचंद्रांचा दास आणि सेवक हनुमान आहे आणि रावणाकडे श्रीरामांचा दूत म्हणून आलो आहे.’
हनुमानाची अशी पूर्ण श्रद्धा होती की, आपल्यात जे काही सामर्थ्य आहे, आपला जो काही प्रभाव आहे, ते सर्व केवळ श्रीरामाच्या कृपेचेच फळ आहे. ती श्रीरामाचीच कृपा आहे. हनुमान स्वतःला प्रभु श्रीरामाचा सेवक समजतो. हनुमानाच्या जीवनातील प्रत्येक प्रसंगामधून त्याचा दास्यभाव, शरणागतभाव आणि त्यांचा अपार कृतज्ञताभाव आपल्याला अनुभवण्यास मिळतो. हनुमान सर्व सामर्थ्यशाली, सर्वगुणसंपन्न आणि महान ज्ञानी असूनही विनम्र भावाने स्वतःला श्रीरामाच्या सेवेत लीन ठेवतो !
– सौ. वैष्णवी बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
‘सिटीझन व्हिजिलान्टे’ : न्याय बंदुकीने करावा कि चांगुलपणा जपत त्याची वाट पहावी ?
कथित स्त्रीवाद्यांकडून हिंदु समाजावर करण्यात येणारे आघात !
मराठी आणि कोकणी या भाषांचे सहअस्तित्व महत्त्वाचे !
निर्मळ हृदयात भक्तीचा उदय होऊन जीव भक्त बनतो !
प्रार्थनेतील भावाने अहं न्यून होणे !
स्वतःभोवती श्रीरामाची प्रकाशमय कडा दिसणे आणि त्यात स्वतः विलीन झाल्याचे जाणवणे !