बोरीभडक (जिल्हा पुणे) येथे कमरूद्दीन याने घरात घुसून केले हिंदु तरुणीचे अपहरण !

  • ३ जणांच्या विरोधात ‘लव्ह जिहाद’प्रकरणी गुन्हा नोंद

  • तरुणीच्या कुटुंबियांना पिस्तूल दाखवून जिवे मारण्याची धमकी

AI निर्मित चित्र

यवत (जिल्हा पुणे) – दौंड तालुक्यातील बोरीभडक येथे धर्मांध कमरूद्दीन मुकीम शेख याने २ जुलै या दिवशी सकाळी १० वाजता एका हिंदु तरुणीचे घरातून अपहरण केले. त्या वेळी कुटुंबातील सदस्यांना मारहाण करून ५ लाख १ सहस्र ५०० रुपये आणि ७ तोळे सोन्याचे गंठण चोरून नेले. या प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी कमरूद्दीन याच्यासह ३ जणांच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. शेख याच्या विरोधात ‘लव्ह जिहाद’प्रकरणी गुन्हा नोेंद केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पीडित मुलीला हडपसर येथील कमरूद्दीन हा गेल्या काही दिवसांपासून त्रास देत होता. त्यामुळे पीडित तरुणी घराबाहेर पडत नव्हती. त्यामुळे कमरूद्दीनने तिच्या घरात घुसून तिचे अपहरण केले. त्या वेळी पीडितेच्या आई-वडिलांनी मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्याने पिस्तूल दाखवून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. तरुणीच्या आईला मारहाण करून अश्लील शिवीगाळ केली, वृद्ध आजोबांना धक्काबुक्की केली.

संपादकीय भूमिका

पूर्वी मुसलमान आक्रमक हिंदु तरुणींचे अपहरण करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करत असत. आज त्यांचेच वंशज त्यांच्या पूर्वजांचा कित्ता गिरवत आहेत. अशांना वठणीवर आणण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ?