आणखी तिघांना अटक; भिवंडी न्यायालयाकडून ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

टीईटी प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण

   

ठाणे – शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात भिवंडी पोलिसांननी बिहार आणि हरियाणा येथून आणखी ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये समस्तीपूर (बिहार) येथील सोनूकुमार सिंह (वय ३३ वर्षे), मिथुनकुमार सिंह (वय ३४ वर्षे) आणि सोनीपत (हरियाणा) येथील कपिल कृष्णा दहिया (वय ४१ वर्षे) यांचा समावेश आहे. तिन्ही आरोपींना भिवंडी न्यायालयाने ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी या प्रकरणात एका महिलेसह ४ जणांना अटक करण्यात आली होती. विशेष अन्वेषण पथक त्यांची कसून चौकशी करत आहे.