संत मीराबाई

गोकुळातील गोपींच्या भक्तीची वार्ता संपूर्ण भरतखंडात पसरत होती. त्यांच्या बाबतचे शब्द कानी पडल्यावर ऐकणार्‍याला आनंदाची अनुभूती येत होती. गोपींची ख्याती ऐकून ‘किंजल’ नावाच्या एका स्त्रीलाही गोपींसारखी भक्ती करण्याची तीव्र इच्छा झाली. गोपींचे अनुकरण करता करता तिची प्रत्येक कृती श्रीकृष्णासाठी होऊ लागली; परंतु पुढे तिचा मृत्यू झाला. तिची अपूर्ण राहिलेली साधना पूर्ण करण्यासाठी देवाने तिला कलीयुगात ‘मीरा’ म्हणून जन्म दिला. लहानपणापासून तिला श्रीकृष्णाचे वेड होते. श्रीकृष्णाची श्वेतमूर्ती हातात घेऊन ती सतत त्याच्याशी खेळत राही. त्याच्याशी एकटीच बोलायची.

सौ. अंजली कणगलेकर

मीरेच्या साधनेतील सगुणोपासनेचा टप्पा तिच्या गेल्या जन्मीच जवळजवळ पूर्ण झाला होता. त्यामुळे कलीयुगात जन्म घेतल्यावर बालपणातच सगुणोपासनेचा टप्पा लवकर पूर्ण झाल्याने तिची निर्गुण कृष्णतत्त्वाकडे जलद वाटचाल चालू झाली. मीरेसमोर गतजन्मांच्या संस्कारांमुळे राधा आणि गोपी यांचा आदर्श होता. त्यांच्या भक्तीची उदाहरणे आपोआप तिला आठवत होती आणि श्रीकृष्णतत्त्वाकडे कसे जायचे, याबाबत तिला श्रीकृष्णच आतून मार्गदर्शन करत होता. प्रत्यक्ष श्रीकृष्णाला न पहाता केवळ त्याच्या मूर्तीतील रूप डोळ्यांसमोर ठेवून निर्गुण श्रीकृष्णतत्त्वावर जिवापाड प्रेम करणे किती कठीण असेल, याची आपल्याला कल्पनाही करता येत नाही ! विवाहानंतर श्रीकृष्णाच्या भक्तीचे वेड वाढत गेले आणि मीरा संत झाली.

– सौ. अंजली कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक