१. थिरूवनंतपूरम् येथील महानगरपालिकेत भाजपच्या नगरसेवकांवर दोनदा शपथ घेण्याची पाळी
‘वर्ष २०२५ मध्ये झालेल्या केरळम्मधील थिरूवनंतपूरम् महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने १०१ जागांमधून ५० जागा जिंकल्या. त्यानंतर १-२ नगरसेवकांचे साहाय्य घेऊन सत्ता मिळवली. यानिमित्त झालेल्या शपथविधी सोहळ्यात २० नगरसेवकांनी भारतमाता, विविध देवता आणि हुतात्मे यांचे स्मरण करून शपथ घेतली. त्या विरोधात ‘एल्.डी.एफ् परिषद’ पक्षाचे नेते एस्.पी. दीपक यांनी केरळ उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. ‘केरळ पंचायत राज राज्य अधिनियम’ कायद्यातील कलम १४३ आणि १५२ प्रमाणे २० नगरसेवकांनी घेतलेली शपथ चुकीची ठरवण्यात आली. याप्रकरणी न्यायमूर्ती पी. व्ही. कुन्हीकृष्णन् यांच्या एकल खंडपिठाने ‘निवडणूक रहित करण्याऐवजी नगरसेवकांनी नव्याने शपथ घेऊन चूक सुधारावी’, असा आदेश दिला. शपथविधी प्रक्रियेने कायद्याचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून नगरसेवकांची निवडणूक रहित करण्याची याचिकाकर्त्याची मागणी केरळ उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

२. भारतीय संसदेत असदुद्दीन ओवैसी यांच्याकडून ‘जय फिलिस्तिन’ची घोषणा
भारतीय राज्यघटनेतील थर्ड शेड्युल आणि कलम १८८ यांत शपथ घेण्यासंदर्भात नियम स्पष्ट केले आहेत. त्यानुसार प्रामुख्याने ‘ईश्वराला स्मरून गंभीरतेने मी शपथ घेतो’, असे म्हणून शपथ घेता येते. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १०२ (ड) नुसार संसदेतील कोणत्याही सदस्याने अन्य कुठल्याही देशाला समर्थन देणे बेकायदेशीर आहे. त्यानुसार त्याचे सदस्यत्व रहित होते. भारतीय संसदेत शपथ घेतांना अन्य देशांशी निष्ठा ठेवणे, हा देशद्रोह आहे. वर्ष २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर खासदारकीची शपथ घेतांना ‘एम्.आय.एम्.’चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी जाणीवपूर्वक ‘जय भीम जय मीम’, ‘अल्लाहू अकबर’ या घोषणांसमवेतच ‘जय फिलिस्तिन (पॅलेस्टाईन)’, अशी घोषणा दिली होती. त्यामुळे नवा वाद निर्माण होऊन सत्ताधारी भाजपच्या खासदारांनी त्यावर आक्षेप घेतला होता. याविषयी काही काळ माध्यमांमध्ये चर्चा चालली; पण त्यापुढे काही झाले नाही. ओवैसी यांच्या विरोधात त्याच वेळी न्यायालयात धाव घ्यायला पाहिजे होती आणि त्याचे सदस्यत्व रहित करायला हवे होते. धर्मांध कुठेही त्यांच्या धर्माविषयीचा पुळका व्यक्त करतात. त्यात ते कधीही चुकत नाहीत. संसदेतही ओवैसी यांनी तेच केले होते.
३. इस्रायलकडून पॅलेस्टाईनचा विध्वंस
लहानशा इस्रायलने डझनभर मुसलमान राष्ट्रांचा विध्वंस करून त्यांचे नाव भूगोलातून पुसले जाईल, अशी स्थिती केली आहे. पॅलेस्टाईनचा तर त्याने पार विध्वंस केला. एकही मुसलमान देश इस्रायलचे वाकडे करू शकला नाही. त्यांच्या नागरिकांमध्ये राष्ट्राविषयी प्रखर असे राष्ट्रप्रेम आहे. त्यांच्या प्रत्येक नागरिकाला शत्रूबोध ठाऊक आहे. त्यामुळे इस्रायल हे धाडस करू शकतो. ते कुठेही हरलेले किंवा तडजोड करतांना दिसत नाहीत.’
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (२७.६.२०२६)


महाराष्ट्रात मराठी भाषेची होत असलेली दुरवस्था आणि सरकारसह प्रशासनाचे कर्तव्य !
स्वामी विवेकानंद यांचे विचार दूरदर्शी !
हरवलेल्या श्रद्धेचा हिंदुत्ववाद !
जीवनातील सकारात्मकता आणि जीवनाचे खरे कार्य !
अध्यात्मातील विविध परिभाषांचे किंवा शब्दांचे आध्यात्मिक अर्थ !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘मुलगा विदेशात असणे’, ही अभिमानाची नाही, तर अत्यंत दुःखाची गोष्ट आहे’ या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण आणि महत्त्व !