आज स्वामी विवेकानंद पुण्यस्मरण (दिनांकानुसार) आहे. त्या निमित्ताने…
वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात पराभव पत्करावा लागला; म्हणून देशात जी मरगळ आली होती, ती स्वामी विवेकानंद यांच्या देश आणि परदेशात दिलेल्या तेजस्वी भाषणांच्या प्रभावाने लयास गेली अन् देशात नवचैतन्याचे वारे वाहू लागले. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी वर्ष १८८५ मध्ये अखिल भारतीय काँग्रेसची स्थापना झाली, तसेच देशभर अनेक ठिकाणी स्वातंत्र्यासाठी चळवळी चालू झाल्या. परिणामतः पुढील ५० वर्षांत स्वातंत्र्य मिळणारच; पण ते मिळाल्यावर देशापुढे कोणते ध्येय असायला हवे ? याचे स्पष्ट विवेचन स्वामीजींनी केले होते.
स्वामी विवेकानंद यांचे विचार मानव कल्याणासाठी भारताच्या विचारांची महानता दर्शवणारे आहेत. ‘जगाला भेडसावणार्या सर्व गंभीर समस्या केवळ भारतीय विचारांच्या आधारे सुटू शकतात’, असे त्यांचे प्रतिपादन आहे; पण ‘या विचारांमागे भारतियांच्या विधायक कार्याची संघटित शक्ती उभी असायला हवी, तरच जगास भारतीय विचारांच्या शक्तीची जाणीव होईल’, असा संदेशही स्वामीजींनी दिला आहे.
‘विश्वगुरु भारत’ होण्यासाठी
भारत वर्ष १९५० मध्ये ‘प्रजासत्ताक राष्ट्र’ झाल्यावर प्राथमिक घडणाची ७६ वर्षे उलटली आहेत. स्वामी विवेकानंद यांनी त्यांचे विचार सांगितले, त्याला आता १२५ वर्षे होऊन गेली आहेत, तरी ते विचार आज अधिक प्रासंगिक आहेत. स्वामीजींची स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. २१ वे शतक हे भारताचे आहे. स्वामीजींचा रोख तरुण पिढीवर आहे. भारत देश आज लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वांत तरुण देश आहे, म्हणजे येथे ६५ टक्के लोकसंख्या ३० ते ४० या वयोगटातील आहे. विशेषतः या वयोगटातील नागरिकांनाही, खरे म्हणजे सर्वांनाच आपापल्या आयुष्यात स्वामीजींचे विचार प्रत्यक्षात उतरवण्याची संधी आहे.
(साभार : ग्रंथ ‘समग्र व्यक्तीमत्त्व विकास’, सुविचार दैनंदिनी)

महाराष्ट्रात मराठी भाषेची होत असलेली दुरवस्था आणि सरकारसह प्रशासनाचे कर्तव्य !
थिरूवनंतपूरम् येथील भाजप नगरसेवकांच्या शपथविधीविषयी केरळ उच्च न्यायालयाची भूमिका !
हरवलेल्या श्रद्धेचा हिंदुत्ववाद !
जीवनातील सकारात्मकता आणि जीवनाचे खरे कार्य !
अध्यात्मातील विविध परिभाषांचे किंवा शब्दांचे आध्यात्मिक अर्थ !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘मुलगा विदेशात असणे’, ही अभिमानाची नाही, तर अत्यंत दुःखाची गोष्ट आहे’ या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण आणि महत्त्व !