‘मायेच्या प्रलोभनात न अडकता केवळ साधना आणि सेवाच करायची आहे’, याची ध्येयनिश्चिती होण्याच्या संदर्भात साधकाला गुरुकृपेने आलेली अनुभूती !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘एकदा माझ्या एका नातेवाइकांनी त्यांच्या आस्थापनात चांगल्या नोकरीची संधी असल्याचे मला सांगितले आणि मला ‘ती नोकरी तू करशील का ?’, असे विचारले. ते त्या आस्थापनात चांगल्या पदावर असल्यामुळे मला तेथे नोकरी मिळू शकली असती; परंतु त्या वेळी मी त्यांना सांगितले, ‘‘माझे ध्येय निश्चित आहे आणि मला साधनाच करायची आहे.’’

हा प्रसंग मी गुरुदेवांना आत्मनिवेदन केला. आश्चर्य, म्हणजे त्यानंतर काही क्षणांतच श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ मला भेटल्या. त्यांनी मला विचारले, ‘‘तू आनंदी आहेस ना ?’’ त्यावर मी ‘हो’, असे उत्तर दिले. त्या वेळी माझ्या मनात त्या नोकरीच्या प्रसंगाविषयी विचार चालू होते. तेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ पुन्हा म्हणाल्या, ‘‘तुला पुष्कळ सेवा करायची आहे आणि सर्व पुढाकार घेऊन करायचे आहे !’’ त्यांच्या या वाक्याने माझे ध्येय आणखी निश्चित झाले.

श्री. दीप पाटणे

२ – ३ दिवसांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ मला पुन्हा भेटल्या. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘दीप, तुला सर्व सेवा दायित्व घेऊन करायच्या आहेत !’’ त्या क्षणी ‘गुरु क्षणोक्षणी साधकाची किती काळजी घेतात ? आणि योग्य वेळी त्याला कसे मार्गदर्शन करतात ?’, याची मला प्रत्यक्ष अनुभूती घेता आली.

या प्रसंगातून मला जाणवले, ‘साधकाच्या मनात एखादा संभ्रम निर्माण झाला, तरी गुरु त्याला योग्य मार्ग दाखवतात.’ ‘मायेच्या कोणत्याही प्रलोभनात न अडकता केवळ साधना आणि सेवाच करायची आहे’, अशी गुरूंनी मला त्या प्रसंगातून जणू आज्ञाच दिली. गुरूंची कृपा आणि त्यांचे मार्गदर्शन हे साधकासाठी अमूल्य असते. गुरूंच्या कृपेनेच साधक मायेच्या प्रलोभनांपासून दूर राहून साधना आणि सेवा करू शकतो.’

‘ही अनुभूती दिल्याबद्दल मी तिन्ही मोक्षगुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या) चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. दीप संतोष पाटणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(१५.३.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक