हावेरी (कर्नाटक) : क्षुल्लक कारणावरून ४ मुसलमानांनी हिंदु दुकानदाराची केली हत्या !

हावेरी (कर्नाटक) – जिल्ह्यातील रट्टीहळ्ळीमध्ये क्षुल्लक कारणावरून मुसलमान तरुणांनी एका हिंदु व्यापार्‍याला अमानुष मारहाण केली. त्याच्या छातीवर दगड मारला आणि गुप्तांगावर प्रहार करून त्याची हत्या केली. शिवाजीराव बायरोजी (वय ६० वर्षे) असे मृत व्यापार्‍याचे नाव आहे.

शिवाजीराव यांचे रस्त्याच्या कडेला छोटेसे दुकान होते. १ जुलैच्या रात्री त्यांचा मुलगा भरत दुकान सांभाळत होता. या वेळी वसीम मुल्ला याने दुकानातून ५ अंडी घेतली आणि १०० रुपये दिले. तरीही ‘मी ५०० रुपयांची नोट दिली आहे. सुटे पैसे परत कर’, असे म्हणत त्याने वाद घातला. हा वाद सोडवण्यासाठी आलेले शिवाजीराव यांच्या छातीवर आरोपींनी दगड टाकला. ४ मुसलमान तरुणांनी मिळून हे आक्रमण केले.

रट्टीहळ्ळी पोलीस ठाण्यात वसीम मुल्ला, सरफराज मुल्ला, सादिक मुल्ला आणि शिराज मुल्ला यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘आरोपींनी माझ्या वडिलांना मारहाण करून त्यांची हत्या केली’, अशी तक्रार त्यांच्या मुलाने दिली. आरोपी पसार आहेत.

संपादकीय भूमिका

राज्यात मुसलमानप्रेमी काँग्रेसचे सरकार असल्याने अशा घटना घडल्या नाहीत, तरच नवल ! हिंदूंनी काँग्रेसला निवडून दिल्याने केलेल्या पापाची फळे ते भोगत आहेत, हे त्यांना लक्षात येत आहे का ?