The Bangladesh Army : बांगलादेशामध्ये खलिफांच्या नावे सैन्याच्या ४ बटालियन

भारताच्या ईशान्य सीमेवर केले जाणार तैनात

(बटालियन म्हणजे सैन्याचे एक पथक)
(खलिफा म्हणजे शरीयतनुसार शासन करणारा)

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात प्रथमच मुसलमान खलिफांच्या नावाने सैन्याच्या ४ बटालियन बनवण्यात आल्या आहेत. सैन्यदलप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी या बटालियनची नावे रशिदुन खलिफा उमर, अबू बकर, अली आणि उस्मान यांच्या नावावर ठेवली आहेत.

प्रत्येक बटालियनमध्ये अनुमाने ७०० सैनिक आहेत. या चारही बटालियनना भारताच्या ईशान्य सीमेवर तैनात केले जाणार आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशाविषयी भारताची भूमिका मवाळ असल्याने तो पाकप्रमाणे डोईजड होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, हे लज्जास्पद !