
‘सनातनच्या रामनाथी आश्रमात रहाणारी साधिका सुश्री कल्याणी गांगण (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ४६ वर्षे) प्रतिदिन एका संतांची वस्त्रे धुण्याची सेवा करते. ही सेवा ती अत्यंत भावपूर्ण आणि परिपूर्ण रितीने करते. त्या संतांची वस्त्रे जेथे वाळत घालायची होती, तेथे असलेल्या ‘पंख्यावर धूळ आहे’, असे एकदा तिच्या लक्षात आले.

तेव्हा तिने विचार केला की, ‘पंखा चालू केल्यावर त्यावरील धूळ संतांच्या नुकत्याच धुतलेल्या स्वच्छ आणि ओल्या वस्त्रांवर पडू शकते अन् ती वस्त्रे मलिन होऊ शकतात.’ हा विचार येताच क्षणाचाही विलंब न लावता तिने तात्काळ तो पंखा स्वतः स्वच्छ केला.
कपडे धुतांना साधारणतः एखादी व्यक्ती ‘कपडे धुण्याची जागा स्वच्छ आहे ना ? हे पाहील आणि ती जागा स्वच्छ करून घेईल; मात्र कपडे वाळत घालतांना ‘तेथील पंख्यावरील धुळीमुळे खाली वाळत घातलेले कपडे अस्वच्छ होतील’, इतका सूक्ष्म विचार करून कुणी सेवा करणार नाही. कल्याणीने मात्र सेवेचा परिपूर्णतेने विचार केला. कल्याणी ‘भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा कशा प्रकारे करते’, याचे हे एक उदाहरण आहे. या उदाहरणातून ‘संतसेवेप्रती भाव कसा असायला पाहिजे’, हेही लक्षात येते.
सेवेतील परिपूर्णता हे आंतरिक भावाचे प्रकटीकरण असते. हाच समर्पितभाव आपल्या प्रत्येक सेवेला आणि कृतीला उच्च स्तरावर घेऊन जातो. सेवा मनापासून, बारकाईने आणि परिपूर्णतेने करतांना साधकांतील भावामुळे त्यात देवत्व येते आणि त्यामुळे साधकांची आध्यात्मिक उन्नतीही होते.
साधकांनो, ‘मनात भाव असेल, तर कृती करतांना किती बारकाईने विचार होऊन त्यात परिपूर्णता येते’, हे कल्याणीच्या उदाहरणातून शिका आणि भावपूर्ण, तसेच परिपूर्ण सेवेद्वारे प्रत्येक कृतीतील देवत्व अनुभवा !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (१४.६.२०२६)
वर्णांनुसार साधनेचे महत्त्व आणि चारही वर्णांची साधना करवून मोक्ष देणारी गुरुकृपायोगानुसार साधना
प्रत्येक सेवा आणि कृती मनापासून अन् भावपूर्ण करणारे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. यशवंत वसाने (वय ७७ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात मंत्रपठण करतांना साधिकेला आलेली अनुभूती
परिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकणे म्हणजे, ईश्वर, देवता यांच्यासह वाईट शक्तींचाही अभ्यास असणे आवश्यक !
आनंदी, प्रेमळ आणि सहनशील वृत्तीच्या रत्नागिरी येथील कै. (सौ.) कविता औंधकर (वय ७२ वर्षे) !