श्री राजमातंगी यज्ञ चालू असतांना देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाच्या परिसरातील वातावरणात जाणवलेले पालट !

‘१७.५.२०२६ या दिवशी मी मुंबई येथील श्री राजमातंगीदेवी यज्ञाचे थेट प्रक्षेपण पहात होतो. त्या वेळी मला देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाच्या परिसरातील वातावरणात पालट झाल्याचे जाणवले. 

कमळावर आरूढ असलेल्या श्री राजमातंगी देवीचे प्रचलित चित्र
श्री. अमित हावळ

१. यज्ञाच्या पूर्णाहुतीच्या वेळी माझे लक्ष सहज बाहेर गेले. तेव्हा आश्रमाच्या परिसरातील वातावरणात पुष्कळ चैतन्य आणि शांतता जाणवत होती. तेव्हा पुष्कळ आल्हाददायक वाटत होते. गार हवेची झुळूक आली आणि माझे मन शांत झाले. आकाशात गुलाबी आणि निळ्या रंगाच्या छटा पाहून माझ्या मनाला शांत अन् प्रसन्न वाटत होते.

आकाशात आलेली निळसर रंगाची छटा
आकाशातील गुलाबी रंगाची आल्हाददायक छटा
गडद गुलाबी रंगाचे दिसणारे आकाश

२. त्यानंतर थोड्या वेळाने यज्ञस्थळी ‘महिषासुरमर्दिनी स्तोत्र’ चालू झाले. संध्याकाळी ७.४७ वाजता अंधार असूनही आकाशातील गुलाबी आणि निळ्या रंगाच्या छटा गडद दिसत होत्या. आकाशाकडे पाहून मला पुष्कळ चैतन्य जाणवत होते. ‘यज्ञातील चैतन्याने आश्रमाच्या भोवती अभेद्य संरक्षक कवच निर्माण झाले आहे’, असा विचार माझ्या मनात येऊन मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.

श्री राजमातंगीदेवीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

– श्री. अमित अशोक हावळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.५.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक