‘मनाचे श्लोक’रूपी संस्कारत्ने !

जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें । जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ।। – मनाचे श्लोक, श्लोक २

अर्थ : समाजात जे वाईट आणि निंदनीय आहे, ते टाळावे. जे चांगले, आदर्श आणि सर्वांना मान्य आहे, ते आचरणात आणावे.

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा । मना सत्यसंकल्प जीवीं धरावा ।। – मनाचे श्लोक, श्लोक ५

अर्थ : वाईट, पापी किंवा चुकीचे विचार टाळावेत. मनात नेहमी सत्य आणि चांगले विचार ठेवावेत.